महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Vegetables rate today : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मिरची दोडका, तोंडली, गवारचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीपाला ( Vegetables Rate Today) होय. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ ( Vegetables Rate Today in APMC Market ) या.

Vegetables rate today
भाज्यांचे दर

By

Published : Jan 3, 2023, 8:02 AM IST

नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्याप्रमाणे मेथीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ५२०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १५०० रुपये ते १८०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये.

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
१७०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४६००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये.


पालेभाज्या :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये.

ABOUT THE AUTHOR

...view details