नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलो प्रमाणे काकडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडी व घेवड्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४१०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपयेकच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपयेकोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९००० रुपये ते १०००० रुपये.शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये इतकी किंमत आहे.