हैदराबाद : यूपीआय (UPI) ने लोकांचे पैसे व्यवहार करण्याची पद्धत बदलली आहे. लहान ते मोठ्या रकमेचे पेमेंट UPI द्वारे केले जात आहे. रिक्षा आणि मेट्रोच्या प्रवासासाठी देखील लोक बहुतेक UPI द्वारे पैसे भरतात. मात्र आता सरकारने याबाबत एक खास सूचना शेअर केली आहे. तुम्हीही यूपीआय वापरत असाल तर तुम्हाला हे ठाऊक असले पाहिजे, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.
तुमचा UPI बंद होईल ?नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 7 नोव्हेंबर 2023 रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांत असे म्हटले आहे की, जर एखाद्या ग्राहकाने गेल्या एक वर्षभरात Google Pay, Paytm किंवा Phonpe सारख्या कोणत्याही थर्ड पार्टी अॅपद्वारे कोणताही व्यवहार केला नसेल तर त्याचा UPI आयडी बंद केला जाईल.
३१ डिसेंबरपर्यंत वेळ : अशा ग्राहकांचा शोध घेण्याच्या सूचना एनपीसीआयने सर्व बँकांना दिल्या आहेत. 31 डिसेंबर 2023 पर्यंत असा कोणताही UPI आयडी सक्रिय न झाल्यास तो 1 जानेवारी 2024 पासून निष्क्रिय केला जाईल, असे मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे. याचा अर्थ असा की तुम्ही कोणतेही UPI व्यवहार करू शकणार नाही. या कारणास्तव, जर तुम्ही गेल्या एक वर्षापासून UPI आयडीद्वारे व्यवहार केले नसेल, तर लगेच UPI आयडी सक्रिय करा.