मुंबई : भारत सर्वाधिक कच्चे तेल आयात करणारा देश आहे. काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आखाती देशांकडून भारत कच्चे तेल आयात करतो. यात इराण, सौदी अरेबीया, इराक अशा इतर देशांचा समावेश आहे. वाढत्या महागाईत क्रूड ऑइलचे दर वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमतीही काहीशी वाढ होईल असा अंदाज आहे. जाणून घेवू या तुमच्या शहरातील तुमच्या राज्यातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर.
तुमच्या शहरांतील आजचे दर : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 33 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 33 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 106 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 04 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 37 पैसे आहे. देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात अगदी किंचीतसा बदल झाला आहे. तुमच्या शहरांतील आजचे दर पाहूण त्यानुसार तुम्ही तुमच्या गाडीची टाकी फूल कपरा.