नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने आपल्या CNG कारमध्ये शेणाचा वापर करणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी मारुती सुझुकीने भारत सरकारची एजन्सी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि आशियातील सर्वात मोठी दुग्ध उत्पादक कंपनी बनस डेअरी यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.
बायोगॅसने वीज निर्मिती : कंपनीने 2030 च्या वाढीच्या धोरणात म्हटले आहे की, त्यांनी 'फुजीसान असागिरी बायोमास' मध्ये देखील गुंतवणूक केली आहे. ही जपानीज कंपनी शेणापासून मिळालेल्या बायोगॅसचा वापर करून वीज निर्माण करते. सुझुकी मोटार कॉर्पोरेशनने सांगितले की, उत्पादनांमधून CO2 उत्सर्जन कमी झाल्यामुळे एकूण CO2 (कार्बन डायऑक्साइड) उत्सर्जनात होणारी वाढ नाकारली जाणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. विक्री युनिट्स वाढवणे आणि एकूण CO2 उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे यामधील समतोल राखण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.
सीएनजी मार्केट मध्ये 70 टक्के वाटा : हे आव्हान पेलण्यासाठी बायोगॅस व्यवसाय हा सुझुकीचा अनोखा उपक्रम आहे. यामध्ये शेणापासून मिळणारा बायोगॅस तयार करून त्याचा पुरवठा केला जाईल. जे डेअरी वेस्ट आहेत, जे प्रामुख्याने भारताच्या ग्रामीण भागात दिसून येतात. हा बायोगॅस सुझुकीच्या सीएनजी मॉडेलसाठी वापरता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. याचा भारतातील सीएनजी कार बाजारपेठेतील वाटा सुमारे 70 टक्के आहे. कंपनीने सांगितले की, 'भारतातील बायोगॅस व्यवसाय केवळ कार्बन न्यूट्रॅलिटीलाच हातभार लावत नाही, तर आर्थिक वाढीलाही चालना देतो. आम्ही भविष्यात आफ्रिका, आशिया आणि जपानसह इतर कृषी क्षेत्रांमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत आहोत.'