मुंबई : नवरात्रीच्या निमित्ताने सोने किंवा सोन्याचे दागिने घेण्याचा विचार करत ( 2 October 2022 Gold Silver Rates Update ) असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या ( Gold Silver Rate in Important Cities in India ) दरातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी या व्यवहाराच्या पाचव्या दिवशी सोन्यासह चांदीच्या दरात वाढ झाली. सध्या सोन्याचा दर 50302 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 56338 रुपये किलोच्या आसपास विकली जात आहे. बाजारात आज शनिवारप्रमाणेच सोने चांदीचे दर आहेत.
शुक्रवारी सोने 299 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आणि 50302 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 498 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आणि 50003 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. त्याचवेळी चांदी 680 रुपयांनी महागून 56338 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी प्रतिकिलो 1134 रुपयांनी महागून 55658 रुपयांवर बंद झाली.