मुंबई: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी मोठ्या शेअर निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बँकिंग समभागांमध्ये सतत परकीय निधीचा ओघ आणि विक्री यामुळे सुरुवातीच्या व्यवहारात घसरण पाहावयास मिळाली. यादरम्यान बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 578.19 अंकांनी घसरून 59,626.87 अंकांवर आला. NSE निफ्टी 144.7 अंकांनी घसरून 17,747.25 अंकांवर बंद झाला.
नफ्यातील,तोट्यातील शेअर्स: सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँक प्रमुख कंपन्यांचे शेअर्स तोट्यात होते. दुसरीकडे, टाटा मोटर्स, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. इतर आशियाई बाजारांमध्ये सोल, टोकियो आणि शांघाय शेअर बाजार तेजीसह व्यवहार करत होते. हाँगकाँग काही नकारात्मक बाजूंना सामोरे जात असतानाहा इतर बाजारांमध्ये मात्र तेजी होती. गुरुवारी अमेरिकी बाजार तेजीसह बंद झाला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी निव्वळ आधारावर 2,393.94 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
डॉलरच्या तुलनेत रुपया वाढला: सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी वधारून 81.52 वर पोहोचला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या 20,000 कोटी रुपयांच्या एफपीओमध्ये विदेशी भांडवलाच्या प्रवाहाच्या अपेक्षेमुळे देशांतर्गत चलनालाही चालना मिळाली आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.५१ वर उघडला. रुपयाची कालची बंद किंमत 81.61 इतकी होती. सुरुवातीच्या डीलमध्ये तो 81.50 ते 81.58 च्या रेंजमध्ये ट्रेडिंग करत होता. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक 0.08 टक्क्यांनी वाढून 101.92 वर पोहोचला. जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.34 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $87.77 वर पोहोचला आहे.
अशी आहे घसरण:बँक समभागांमध्ये बंधन बँकेचे समभाग २.९६ टक्क्यांनी, आयसीआयसीआय बँक २.८५ टक्क्यांनी, पंजाब नॅशनल बँक २.६१ टक्क्यांनी, बँक ऑफ बडोदा २.३९ टक्क्यांनी, एचडीएफसी बँकेचे २.३३ टक्क्यांनी घसरले, तर एसबीआयचे समभागही २.२३ टक्के घसरले. कोटक महिंद्रा बँकही 1.31 टक्क्यांनी घसरली. निर्देशांकांमध्ये बँक निफ्टी 2.33 टक्क्यांनी, निफ्टी ऑइल अँड गॅस 3.88 टक्क्यांनी, निफ्टी मेटल 0.53 टक्क्यांनी घसरले तर निफ्टी रिअॅल्टी 0.36 टक्क्यांनी घसरले तर निफ्टी ऑटो आणि फार्माचे शेअर्स अनुक्रमे 1.64 टक्के आणि 0.28 टक्क्यांनी वधारले आहेत. आशियाई बाजारात जपानचा निक्केई 5 अंकांनी, हाँगकाँगचा हँग सेंग 11 अंकांनी घसरला. चीनचा शांघाय शेअर बाजार 24 अंकांनी तर एस आणि पी 24 अंकांनी वाढला.
हेही वाचा: Republic Day Sale 2023 ऑनलाइन सेल्सवर धमाकेदार ऑफर्स ९ हजारात टॅबलेट आणि बरंच काही