मुंबई: आशियाई बाजारातील संमिश्र व्यवहार आणि एचडीएफसी, एचडीएफसी बँकेच्या समभागांची झालेली जोरदार खरेदी यामुळे प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात वधारल्याचे दिसून आले. यादरम्यान, बीएसई सेन्सेक्सने जोरदार सुरुवात केली. बीएसई 159.54 अंकांनी वाढून 60851.08 अंकांवर पोहोचला, तर एनएसई निफ्टी 61.25 अंकांनी वाढून 17,905.85 वर पोहोचला.
वाढलेले आणि घसरलेले शेअर्स:एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, लार्सन अँड टुब्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, सेन्सेक्स पॉवर ग्रिडमधील एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो, टीसीएस, एचडीएफसी या कंपन्यांचे शेअर्स आज वधारले. तर दुसरीकडे, अॅक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.
हॉंगकॉंग, जपानच्या बाजारात घसरण:आशियाई बाजारात, दक्षिण कोरिया आणि चीन वाढीसह व्यवहार करत होते तर हाँगकाँग आणि जपान तोट्यात होते. सोमवारी अमेरिकन बाजार बंद होते. याआधी सोमवारी बीएसई सेन्सेक्स 311.03 अंकांनी घसरून 60,691.54 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 99.60 अंकांनी घसरून 17,844.60 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 1.06 टक्क्यांनी घसरून $83.18 प्रति बॅरलवर आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) सोमवारी निव्वळ आधारावर 158.95 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.