महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Share Market Update : शेअर बाजारात सेन्सेक्स 64 हजाराच्या पार, तर निफ्टी 19,108 अंकांवर - एचडीएफसी

परदेशी संस्थेच्या गुंतवणुकीची आवक आणि जागितक बाजारातील सकारात्मकतेसह शेअर बाजार मजबूत स्थितीत दिसला. सेंसेक्स साधरण 500 अंकांनी वधारला होता. तर निफ्टीने 19,108.20 अंकांवर मजल मारली आहे. मजबूत भागीदारी असलेल्या इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेतील खरेदीनेही बाजाराला साथ दिली होती.

शेअर बाजाराची बंपर सुरुवात
शेअर बाजाराची बंपर सुरुवात

By

Published : Jun 30, 2023, 2:01 PM IST

मुंबई: कंपन्यांनाचा तिमाही बॅलन्सशीटचा अंदाज आणि व्यवहार सुरळीत राहिल्याने शेअर बाजारही चांगल्या स्थितीत होते. बीएसई सेंसेक्सने शुक्रवारी सुरुवातीलाच एक विक्रम बनवला. सकाळी बाजार चालू होताच सेंसेक्स 362.59 अंकांवर म्हणजेच 0.57 टक्क्यांने तेजीवर होता. निर्देशांकात मजबूत भागीदारी असलेल्या इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेतील खरेदीनेही बाजाराला साथ दिली. 30 शेअर्सचा सेन्सेक्स 499.42 अंकांनी वधारून 64,414.84 या उच्चांकावर पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 136.1 अंकांनी वाढून 19,108.20 या विक्रमी उच्चांकावर सुरू झाला होता.

नफा आणि तोट्यातील शेअर्स : आज शेअर्स बाजारात बहुतेक शेअर्समध्ये वृद्धी झाली होती. पॉवर ग्रिड, इन्फोसिस, एशियन पेंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक आणि टायटन हे सेन्सेक्स समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसली. तर टाटा स्टील आणि भारत एअरटेलच्या समभागांमध्ये म्हणजेच शेअर्समध्ये अनेकांना तोटा सहन करावा लागला. याचबरोबर आशियातील इतर बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्स आणि हाँगकाँगचा हँग नफ्यात होता. तर जपानचा निक्केई तोट्यात होता.

डॉलरच्या तुलनेत रुपया सपाट : शुक्रवारच्या बाजारात अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया 82.02 प्रति डॉलरवर जवळपास सपाट राहिला होता. देशांतर्गत इक्विटी बाजारातील तेजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत स्थिरता यामुळे रुपया स्थिर राहिला होता. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया 82.05 या कमकुवत किमतीत सुरू झाला. त्यानंतर रुपया 82.01 ते 82.02 प्रति डॉलरच्या आत राहिला. सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी वाजता रुपया बुधवारी स्थिरावलेल्या पातळीपासून अवघ्या एक पैशांच्या वाढीसह 82.02 प्रति डॉलरने उभा राहिला होता. दरम्यान गुरुवारी बकरी ईदनिमित्त गुरुवारी चलन बाजार बंद होता. सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दर्शविणारा डॉलर निर्देशांक 0.06 टक्क्यांनी घसरून 103.28 वर आला होता.

इंडिगोचा शेअर्स ३० टक्क्यांनी वाढला : कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 3.61 टक्क्यांनी वाढून 2,621.10 रुपयांवर बंद झाले. शेअर्सच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे कंपनीचे बाजार मूल्य बीएसईवर 1,01,007.56 कोटी रुपयांपर्यंत वाढले. या वर्षात आतापर्यंत बीएसईवर स्टॉक 30.53 टक्क्यांनी वधारला आहे. तर या काळात सेन्सेक्स केवळ 5 टक्क्यांनी वाढला आहे. इंडिगो कंपनीने आपल्या विस्ताराच्या योजना लक्षात घेऊन गेल्या आठवड्यात एअरबसला 500 विमानांची ऑर्डर दिली आहे. एअरबसला कोणत्याही विमान कंपनीकडून मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. इंडिगो ही देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी आहे. आता ती आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील वाढवत आहे. मे महिन्यात देशांतर्गत बाजारात त्याचा हिस्सा 61.4 टक्के होता.

हेही वाचा -

  1. Rules Change From July : जुलैमध्ये होणारे हे मोठे बदल तुमच्यावर करतील परिणाम...
  2. Today Petrol Diesel Rates: आजचे पेट्रोल डिझेल, सोने चांदी आणि क्रिप्टोकरन्सीचे दर, एका क्लिकवर वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details