मुंबई Share Market Update : यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा जागतिक बाजारावर चांगलाच परिणाम झाला आहे. त्यामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं. निफ्टी 50 अंकाच्या मजबूत वाढीसह बाजाराला आज सुरुवात झाली आहे. बीएसईवर सेन्सेक्स 561 अंकांच्या उसळीसह 70 हजार 146 वर उघडला. त्याचवेळी एनएसईवर निफ्टी 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 21 हजार 110 वर उघडला. आज बाजारात बँक निफ्टी 1 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे.
यूएस फेडरल रिझर्व्हनं केला नाही कोणताही बदल :मागील वर्षी महागाई कमी झाल्याचा दाखला देत यूएस फेडरल रिझर्व्हनं बुधवारी प्रमुख व्याजदरात कोणताही बदल केला नाही. चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या नेतृत्वाखाली फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) आता पुढील वर्षी तीन दर कपातीची अपेक्षा करत व्यक्त करत आहे. त्यामुळे यूएस फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात बदल न केल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली आहे.