मुंबई : मागील सत्रातील वाढीव नफ्यामुळे, भारतीय स्टॉक निर्देशांक आज सकाळी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ( share market today ) नवा उच्चांक गाठला आहे. विदेशी निधीचा मजबूत ओघ, रुपयाची सापेक्ष ताकद आणि यूएस फेडने धोरणात्मक दर कमी करण्याबाबत दिलेला इशारा यामुळे ( Sensex Nifty touch fresh lifetime ) भारतीय शेअर बाजाराला आधार मिळाला.
शेअर बाजाराचा ( Mumbai share market update ) निर्देशांक सकाळच्या सत्रात 201.93 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी वाढून 62,706.73 अंकावर, तर निफ्टी 63.95 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी वाढून 18,626.70 ( BSE index live today ) अंकावर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत भारतात 31,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इक्विटी खरेदी केल्या आहेत.