मुंबई :गेले काही दिवस शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. रशियन युक्रेन युद्दाचा परिणाम तसेच देशात वाढणारी महागाईचा दर या सर्वांचा परिणाम शेयर बाजारावरही दिसत आहे. आज सकाळी सेन्सेक्स (Sensex) 439.51 अंकांची घसरण होऊन 56,757.64वर सुरु झाला तर निफ्टीमध्येही (Nifty) 162.95 अंकांची घसरण होऊन 17,009.05वर सुरु झाला.
याआधी गेल्या काही दिवसातील घटनांमुळे शुक्रवारी शेअर बाजार जवळपास 2 टक्क्यांनी घसरला होता. सेन्सेक्स 1,141.78 अंकांनी अर्थात 1.95 टक्क्यांनी घसरून 57,197.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 303.65 अंकांच्या म्हणजेच 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 17,172 वर बंद झाला. मे मध्ये यूएस फेडरल रिझर्व्हने दर वाढवल्यानंतर, बॉन्ड यील्ड वाढ, मिश्र तिमाही निकाल आणि रशिया-युक्रेनमधील परिस्थिती बिघडली ल्याने शेअर बाजार लाल रंगात बंद झाला.