महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Rice Price : भारताच्या 'या' एका निर्णयाचा अख्ख्या आशिया खंडावर परिणाम; जाणून घ्या... - आशियाई बाजारात तांदळाच्या किमती

Rice Price : कोट्यवधी लोकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या तांदळाच्या निर्यातीवर भारतानं बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. त्यामुळं याचा परिणाम आता थेट जगभरातील बाजारपेठांमध्ये दिसू लागलाय.

Rice
तांदूळ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 9:20 AM IST

नवी दिल्ली : Rice Price : तांदूळ हा एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्याशिवाय आपली जेवणाची थाळी अपूर्ण मानली जाते. भारतानं सध्या काही काळ तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याचा परिणाम आता जगभरातील देशांमध्ये दिसून येतोय. अनेक देशांमध्ये तांदळाचे दर गगनाला भिडल्यानं लोकांच्या स्वयंपाकघराचं बजेट बिघडलंय. आशियाई बाजारात सध्या तांदळाच्या किमती १५ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.

तांदळाचे भाव १५ वर्षांच्या उच्चांकावर : भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. यानंतर थायलंड आणि व्हिएतनामचा क्रम लागतो. भारतानं २० जुलैला तांदूळ आणि इतर धान्यांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, गेल्या आठवड्यातच ही बंदी आणखी कडक करण्यात आली. परबोल्ड आणि बासमती तांदळाच्या निर्यातीवर आणखी निर्बंध घालण्यात आले. त्याचा थेट परिणाम भारतातून तांदूळ आयातीवर अवलंबून असलेल्या देशांमध्ये दिसू लागला आहे. यामुळे आशियाई बाजारात सध्या तांदळाचे भाव गगनाला भिडले आहेत.

जागतिक बाजारपेठेत तांदळाची किंमत : जागतिक बाजारात तांदळाची किंमत सध्या ६४६ डॉलर प्रति टन आहे. मात्र, या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदा भारतात कमी पावसामुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम झालाय. त्यातच थायलंडमध्येही दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तांदळाची किंमत आणखी वाढू शकते. याउलट, चीनमध्ये मात्र तांदळाचं उत्पादन चांगलं झालंय. त्यामुळे चीन ही कसर भरून काढण्याची शक्यता आहे.

भारताने तांदूळ निर्यातीवर बंदी का घातली? : देशात गतवर्षीच्या तुलनेत यंदा तांदूळ महागला. हे पाहता केंद्र सरकारनं देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही सरकारनं तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर जुलै महिन्यात बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. त्याच वेळी, गेल्या आठवड्यात, परबोल्ड आणि बासमती तांदळावर अधिक कडक निर्बंध लादल्या गेले.

हेही वाचा :

  1. Rule Change From १st September २०२३ : देशात आजपासून 'हे' मोठे बदल; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम
  2. ४ September २०२३ : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोने-चांदीचे दर? जाणून घ्या, बाजारभाव...

ABOUT THE AUTHOR

...view details