नवी दिल्ली देशातील सर्वात मोठी औद्योगिक कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची Reliance Industries Ltd आज वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम AGM होत आहे. ही बैठक दुपारी दोनपासून सुरू होणार आहे. चेअरमन मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या वार्षिक बैठकीला रिलायन्स इंडस्ट्रीजची 45 वी एजीएम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील. आरआयएलच्या गुंतवणूकदारांसोबतच कॉर्पोरेट जगत आणि शेअर बाजाराच्या नजराही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमवर लागल्या आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमकडून काय अपेक्षा आहेत दरवर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये अशा काही योजना किंवा व्यावसायिक घोषणा केल्या जातात. ज्याची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी ही एजीएम खूप खास असणार आहे. कारण रिलायन्स जिओ 5G लाँच करण्यासाठी काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष असेल. यासोबतच कंपनीच्या पुढील बिझनेस प्लॅनच्या घोषणेमध्ये कोणती मोठी घोषणा होणार आहे, याची प्रतीक्षा आहे. याशिवाय रिलायन्स जिओ, रिलायन्स रिटेलच्या आयपीओबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे, हे कळू शकते. तसेच, मुकेश अंबानी आपल्या व्यवसायाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्यासंबंधी काही घोषणा करतात का? त्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.