मुंबई :बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून असतात. महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Rate Today ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या ( Petrol Diesel Rate 09 january 2023 ) दरांवरही पडत ( Petrol Diese ) असतो.
डायनॅमिक इंधन किंमत प्रणाली : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किंमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात, तेव्हा भारतात इंधनाच्या किमती ( Petrol Rates Today In Maharashtra ) वाढतात.तेल किंवा इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग सरकारकडे आहे, तो म्हणजे तेल कंपन्या रिटेल व्यावसायिकांना देत असलेला दर नियंत्रित करणे. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या ( Petrol Diesel Rates Today in Maharashtra ) आहेत.