मुंबई:सध्या सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल विक्रीवर जवळपास 5 रुपये प्रति लिटरचा फायदा होत आहे. तर डिझेलच्या विक्रीवर जवळपास 13 रुपये प्रति लिटरचा तोटा होत आहे. जर क्रूड ऑईलच्या किंमती 80 डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी राहिल्या तर कंपन्यांचा तोटा भरुन निघण्यास मदत होईल. येत्या फेब्रुवारी 2023 मध्ये कच्चा तेलाच्या भावात अजून घसरणीची शक्यता आहे. सौदी अरेबियाने कच्चा तेलाचा भाव कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी रोजी सौदी सरकारची सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरमॅकोने सर्व प्रकारच्या कच्चा तेलाचा भाव कमी करण्याचा निर्णय जाहीर केले आहेत. आज इंधन दर स्थिर आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल आहेत: आज मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. अहमदनगर पेट्रोल 106.53 तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 107.61 तर डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 107.62 पेट्रोल आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.70 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर,
इतर शहरातील दर:नांदेडमध्ये पेट्रोल 108.12 तर डिझेल 94.60 रुपये प्रति लिटर आहे. जळगावमध्ये पेट्रोल 106.46 आणि डिझेल 92.98 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 107.11 रुपये आणि डिझेल 93.59 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.36 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.90 आणि डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 105.26 आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.86 रुपये तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर आहे.
क्रूड ऑईलच्या भावात 0.93 टक्क्यांची घसरण:गेल्या काही दिवसांपासून भावात सातत्याने चढ-उतार होत असला तरी पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा भरुन निघण्यासाठी मदत नक्कीच झाली आहे. डबल्यूटीआई क्रूड 80 डॉलर प्रति बॅरलवरुन 79.68 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. भारतात कच्चा तेलाची खरेदी किंमत 80 डॉलर प्रति बॅरलवरुन 79.98 प्रति डॉलरवर पोहचली आहे. काल ब्रेंड क्रूड ऑईलच्या भावात 0.93 टक्क्यांची घसरण होऊन ते 86.66 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआईमध्ये 1.64 टक्क्यांची घसरण होऊन ते 79.68 डॉलर प्रति बॅरलवर होते. या घसरणीचा फायदा लवकरच भारतीय वाहनधारकांना मिळू शकतो.
हेही वाचा: Today Petrol Diesel Rates आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव घसरला जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर