नवी दिल्ली - हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी फर्म ओयो ( OYO) सप्टेंबरनंतर आपली प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) लाँच करण्याची योजना आखत आहे. कंपनीने या संदर्भात बाजार नियामक सेबीला पत्र लिहून आपला अर्ज अपडेट करण्याची विनंती केली आहे.
OYO IPO: सप्टेंबरनंतर आयपीओ लाँच करण्याची 'ओयो'ची योजना, मूल्यांकनातही होऊ शकते घट - Oyo New Scheme
सप्टेंबर नंतर ओयो ( Oyo ) आपली प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering) आणण्याची योजना आखत आहे.
![OYO IPO: सप्टेंबरनंतर आयपीओ लाँच करण्याची 'ओयो'ची योजना, मूल्यांकनातही होऊ शकते घट ओयो प्रारंभिक सार्वजनिक ऑफर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15373441-438-15373441-1653392807926.jpg)
कंपनीने आयपीओद्वारे 8430 कोटी रुपये उभारण्यासाठी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सेबीकडे अर्ज केला होता. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की कंपनी आता 11 बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत 7-8 बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या कमी मूल्यावर तयार आहे. ते म्हणाले की कंपनी सप्टेंबर तिमाहीनंतर IPO करू इच्छित आहे कारण तोपर्यंत आर्थिक कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. तसेच तोपर्यंत बाजारातील परिस्थिती अनुकूल असू शकते. संपर्क साधला असता, ओयोने टिप्पणी करण्यास नकार दिला.
हेही वाचा -सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये सेन्सेक्सने 311 अंकांची घेतली उसळी; निफ्टी 83 अंकांपेक्षा अधिक वाढला