हैदराबाद -सध्या विविध प्रकारे कंपन्या गुंतवणुकदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत. यात बाँड नावाचा गुंतवणुकीचा पर्यायही सध्या प्रकाशझोतात आला आहे. बाँड म्हणजे एक प्रकारे कंपनीसोबत झालेला गुंतवणुकीचा करार. ज्यात कंपन्या गुंतवणूकदारांशी केलेल्या व्यवहाराच्या अटी, व्याज देयके, निधी परत करण्याची वेळ हे नमूद केलेले असते. ज्या गुंतवणुकदारांना सातत्यपूर्ण परतावा हवा असतो त्यांनी बाँड्सवर पैसे लावणे कधीही योग्य ठरते. आजच्या काळात बाँड्सकरून पैसे उभारण्याकडे कंपन्यांचा कल ( companies raise money through bonds ) असतो. यातही अनेक लोक बाँड्स आणि एफडी समान असल्याचे गृहीत धरतात, परंतू गुंतवणुकीसाठी बाँड्सकडे लक्ष देणाऱ्या गुंतवणूकदारांनी यातील फरक लक्षात घेतले पाहिजेत. अलीकडेच विविध कंपन्यांनी बाँड्स जारी केले आहेत, त्यांच्या निवडीत कोणती खबरदारी घेतली पाहिजे ते पाहू .
सर्वप्रथम बाँड्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपन्यांचे क्रेडिट रेटिंग तपासने महत्त्वाचे ( check bonds credit rating before investing ) आहे. कंपन्या बाजारातून पैसे उभारण्यासाठी बाँड जारी करतात परंतू त्याचे थर्ड पार्टीकडून रेटिंग जारी केले जाते. Crisil, Icra आणि CARE सारख्या एजन्सी बाँड्सना रेटिंग देतात. यात AAA हे चांगले रेटिंग ( AAA means highest rating ) , तर D म्हणजे सर्वात कमी रेटिंग ( D implies lowest rating ) मानले जाते. जेव्हा कंपनी पेमेंटमध्ये डिफॉल्ट असते, तेव्हा 'डी' रेटिंग दिले जाते, त्यामुळे अशा कंपन्यांपासून दूर राहणे चांगले आहे. तर दुसराकीडे, सरकारी बाँड्स 'सार्वभौम' रेटिंगचा अभिमान बाळगतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर ते शून्य-जोखमीचे असतात. त्यामुळे ते कॉर्पोरेट बाँडपेक्षा ते विश्वसनीय असतात. मात्र, इथे लक्षात घेण्याजोगी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्च-रेटिंग बाँड्सवर कमी व्याज मिळते, तर कमी-रेटिंग असलेल्या बाँड्सवर चांगल्या व्याजाची हमी मिळेत.
हेही वाचा -तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्या T-Hub च्या नवीन सुविधेचे करणार उद्घाटन
बाँड्स हे फक्त ठराविक काळासाठीच उपलब्ध असतात. काही कंपन्या देय तारखेपूर्वी त्यांचे बाँड विकून टाकतात. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा कंपन्या त्यांचे बाँड बाजारातून काढून घेतात. त्याऐवजी कमी व्याजदरासह नवीन बाँड जारी करतात, तेही फक्त त्यांच्या व्याजाचा बोजा कमी करण्यासाठी. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांना कमी व्याजदर असलेले बाँड विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो.