नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे मेथीच्या किंमतीत ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे, तर भेंडीच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे. ( Vegetable Price Hike ) इतर भाज्यांच्या किंमती स्थिर आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ४३०० ते ५००० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ६५०० ते ७५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये
गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६३०० ते ७५०० रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४८०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४६०० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २२०० रुपये