मुंबई Muhurat Trading:भारतात आज (रविवार, १२ नोव्हेंबर) दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दिवाळीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी सकाळी शेअर बाजार बंद असतो. मात्र संध्याकाळी विशिष्ट मुहूर्तावर तो एका तासासाठी उघडल्या जातो. याला 'मुहूर्त ट्रेडिंग' असं म्हटलं जातं.
सेन्सेक्स ३६६.८६ अंकांनी वधारला : दरम्यान, मुंबईचा शेअर बाजार रविवारी संध्याकाळी एका तासासाठी खुला करण्यात आला. सायंकाळी ६.१५ वाजता 'मुहूर्त ट्रेडिंग' सुरू झालं. दिवाळीला 'मुहूर्त ट्रेडिंग' सुरू होताच सेन्सेक्स ३६६.८६ अंकांनी वधारला. शेअर बाजार एकूण एक तास म्हणजे ७.१५ पर्यंत चालला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) नं गेल्या महिन्यात दिवाळीच्या वेळी 'मुहूर्त ट्रेडिंग' सत्र आयोजित करण्याची घोषणा केली होती. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एल अॅंड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ दीनानाथ दुभाषी उपस्थित होते.