मुंबई : अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढू लागल्या आहेत. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या समभागांनी 15-20 टक्क्यांच्या वाढीसह त्याच्या अप्पर सर्किट लिमिटला स्पर्श केला. अदानी समूहाच्या आठ कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात नफ्यात होते, तर दोन कंपन्यांचे शेअर्स तोट्यात होते. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत होती.
शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंत झाली वाढ :आज अदानी समुहाच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली. यामुळे या समूहावरील गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा एकदा वाढला आहे. प्रदीर्घ काळानंतर या समूहाच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. अदानी समूहाच्या दोन कंपन्यांनी अपर सर्किटला स्पर्श केला. अदानी एंटरप्रायझेस, अदानी विल्मर, अदानी ग्रीन, अदानी पोर्ट्स, एसीसी सिमेंट, अंबुजा सिमेंट या समभागांना गती मिळाली.
अप्पर सर्किट म्हणजे काय : शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचे सर्किट असतात. पहिले अप्पर सर्किट आणि दुसरे लोअर सर्किट. अप्पर सर्किट म्हणजे त्या दिवशी स्टॉकची कमाल किंमत. अशाप्रकारे, लोअर सर्किट ही त्या दिवशी स्टॉकची सर्वात कमी किंमत असते. BSE वरील अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 15-20 टक्क्यांच्या उडीसह 1,808.25 रुपयांच्या वरच्या मर्यादेपर्यंत पोहोचले. कंपनीचे बाजार भांडवल 2.06 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेस इकॉनॉमिक झोन 8.96 टक्क्यांनी वाढून 595 रुपयांवर पोहोचले. कंपनीचे बाजारमूल्य 1.28 लाख कोटी रुपये होते.