महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Rules Change From 1 July : 1 जुलैपासून होणार या नियमांत बदल, थेट संबंध आहे तुमच्या खिशाशी - एलपीजी किंमत

1 जुलैला महिना बदलला आणि त्यासोबत अनेक नियमही बदलले. यामध्ये स्वयंपाकाचा गॅस तसेच अल्पबचत योजना आणि क्रेडिट कार्ड वापरण्यासंबंधीच्या नियमांचा समावेश आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर.

Rules Change From 1 July
1 जुलैपासून नियमांत बदल

By

Published : Jul 1, 2023, 4:58 PM IST

नवी दिल्ली :आजपासून नवा महिना सुरू होत आहे. बदलत्या महिन्यानुसार काही नियमही बदलले आहेत. तर काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. याचा थेट संबंध सर्वसामान्य जनतेच्या खिशाशी आहे. यामध्ये, एलपीजी पासून सीएनजी ते पीएनजीच्या किंमतींमध्ये बदल, पॅन-आधार लिंकिंग अपडेट आणि एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरणाचा समावेश आहे.

एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही

एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही : सरकारी कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. मात्र, यावेळी गॅस वितरण कंपन्यांनी एलपीजीच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच, व्यावसायिक आणि घरगुती एलपीजी सिलिंडर पूर्वीच्याच किमतीत उपलब्ध असेल. राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे.

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड वापरावर 20 टक्के टीडीएस : परदेशात क्रेडिट कार्डच्या वापरावर टीडीएस (उत्पन्नाच्या स्त्रोतावर कर) 20 टक्के शुल्क आकारले जाईल. हा नियम आजपासून लागू झाला आहे. 7 लाखांपेक्षा जास्त खर्च केल्यास, बँक 20 टक्क्यांपर्यंत टीडीएस आकारेल. त्याच वेळी, शिक्षण आणि उपचारांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळेल. यावर 5 टक्के टीडीएस असेल.

पॅन-आधार लिंक करण्याची मुदत संपली

पॅन कार्ड निष्क्रिय : आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 होती, जी आता संपली आहे. त्यामुळे आता पॅनकार्डधारकांचे कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. हे पॅनकार्ड कोणत्याही कामासाठी वापरल्या जाऊ शकत नाही. असे केल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम 272B अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

लहान बचत योजनांच्या नियमात बदल

लहान बचत योजनांच्या नियमात बदल : जुलै ते सप्टेंबर या महिन्यांसाठी अल्पबचत योजनांचे नियम बदलण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार व्याजदरात 0.30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एका वर्षाच्या एफडीसाठी व्याजदर 6.80 टक्क्याहून वाढवून 6.90 टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के आणि आरडीनंतरच्या 5 वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याजदर मिळेल. मात्र, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण : देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण आजपासून प्रभावी झाले आहे. यासह, एचडीएफसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये एचडीएफसी लिमिटेडच्या सेवा उपलब्ध होतील. ज्यामध्ये कर्ज, बँकिंगसह इतर सुविधांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. Bank Holiday In July 2023 : जुलै महिना आहे सुट्टीचा; आरबीआयकडून बँकांच्या सु्ट्टीची यादी जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details