नवी दिल्ली:भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा बंपर इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) बंद झाल्यानंतर एका आठवड्यानंतर 17 मे रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होण्याची शक्यता ( LIc IPO to be listed in exchange on may 17 ) आहे. सरकार LIC मधील 22.13 कोटी पेक्षा जास्त शेअर्स 902-949 च्या प्राइस बँडवर विकत आहे. ही विक्री 4 मे पासून सुरु होणार असून, 9 मे रोजी बंद होईल. SEBI कडे एलआयसीने दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, समभाग हे वाटप करणार्या बोलीदारांच्या डिमॅट खात्यात 16 मे पर्यंत उपलब्ध असतील. त्यानंतर एलआयसी स्टॉक एक्सचेंजमध्ये इक्विटी शेअर्सचे व्यवहार सुरू करेल. त्यानंतर 17 मे रोजी स्टॉक लिस्ट होईल. गुंतवणूकदार 2 मे रोजी शेअर विक्रीसाठी बोली लावतील, तर इश्यू 4 मे रोजी संस्थात्मक आणि किरकोळ खरेदीदारांच्या वर्गणीसाठी उघडेल आणि 9 मे रोजी बंद होईल.
LIC To List On Stock Exchanges : LIC 17 मे रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये होणार सूचीबद्ध - minimum of 15 equity shares and in multiples of 15 equity shares
एलआयसीची बंपर इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) बंद झाल्यानंतर एका आठवड्यात म्हणजे 17 मे रोजी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होण्याची शक्यता ( LIc IPO to be listed in exchange on may 17 ) आहे.
सरकार लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) मधील २२ कोटी १३ लाख ७४ हजार ९२० शेअर्स विकत आहे. सुमारे 21,000 कोटी रुपये यामाध्यमातून उभारण्याचे लक्ष्य आहे. १५ लाख ८१ हजार २४९ शेअर्स आणि २ कोटी २१ लाख ३७ हजार ४९२ शेअर्स कर्मचारी आणि पॉलिसीधारकांसाठी राखीव आहेत. ९.८८ कोटी पेक्षा जास्त शेअर्स क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIBs) साठी आणि 2.96 कोटी पेक्षा जास्त शेअर्स गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव आहेत. किरकोळ गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचार्यांना प्रति शेअर 45 रुपये सवलत मिळेल, तर आयपीओमध्ये बोली लावणाऱ्या एलआयसी पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपये सूट मिळेल. SEBI ने मंजूर केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये, LIC ने सांगितले की, किमान 15 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 15 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावली जाऊ शकते.
हेही वाचा : LIC IPO: एलआयसी आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी 'हे' वाचा
TAGGED:
एलआईसी आईपीओ