मुंबई :आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती सध्या चांगली दिसून येत नाही. परंतु याही परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था अजूनही स्थिर आणि चांगली आहे. ही भारतासाठी चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. भारत सर्वाधिक कच्चे तेल आयात करणारा देश आहे. परिणामी काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जागतिक बाजारात शनिवारी कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झालेली पाहावयास मिळाली. शनिवारी डब्ल्यूटीआय क्रूड 2.49 डॉलर म्हणजेच 3.28 टक्क्यांनी घसरून 73.39 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. क्रूड ऑईल 2.49 डॉलरने घसरले आहे. देशातील तेल कंपन्यांनी देखील पेट्रोल डिझेलच्या दरात बदल केला आहे.
तुमच्या शहरांतील आजचे दर : देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झाला आहे. पहा तुमच्या शहरांतील आजचे दर काय आहेत. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 43 पैसे, तर डिझेलचा दर 92 रुपये 94 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 14 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 69 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 106 रुपये 49 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 04 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 70 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 19 पैसे आहे.