मुंबई :अर्थसंकल्पामुळे सोन्याचेच नव्हे तर चांदीच्या दरातही वाढ झाली. मात्र, सोमवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोमवारी सोन्याचा दर ५६८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. दुसरीकडे, शुक्रवारी सोन्याचा दर ५७५५७ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे, संपूर्ण आठवड्यात प्रति दहा ग्रॅम ७०७ रुपयांची वाढ नोंदवली. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात तेजी पाहावयास मिळाली होती. गेल्या आठवड्यात सोमवारी चांदीचा दर ६८१४९ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. दुसरीकडे, शुक्रवारी चांदीचा दर ६९५३९ रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला होता. अशाप्रकारे, संपूर्ण आठवड्यात चांदीचा दर १३९० रुपये प्रति किलोच्या वाढीसह बंद झाला होता.
या आठवड्यातील दर :२ फेब्रुवारी २०२३ रोजी सोन्याचा सर्वकालीन उच्चांक होता. त्यावेळी सोन्याचा भाव ५८८८२ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदीचा सर्वकालीन उच्च दर ७५००० रुपये होता. सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ५७,३१० रुपये प्रती तोळापर्यंत पोहोचले. त्याआधीच्या सत्रात त्या अंदाजे ५७३१० रुपये प्रती तोळा होते. त्यामुळे दोन्ही सत्रांच्या तुलनेत त्यात काल कोणतीही वाढ झाली नाही. २२ कॅरेटसाठी सोमवारचे दर हे अंदाजे ५२५५० रुपये प्रती तोळा होते. सोमवारी ते अंदाजे ५३५५० रुपये आहेत. त्यात काल कोणतीही वाढ झालेली नाही. चांदीच्या किंमतींमध्ये ७१२०० रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत.