महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 9, 2023, 7:00 AM IST

ETV Bharat / business

Today Petrol Diesel Rates: काय आहेत तुमच्या शहरातले आजचे पेट्रोल डिझेलचे दर, जाणून घ्या एका क्लिकवर

भारतात दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारित करतात. आज थोडी दिलासादायक बाब म्हणजे आज अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-आणि डिझेलच्या किंमतीत काहीसा बदल झाला आहे. तर जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत.

Today Petrol Diesel Rates
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

मुंबई: बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून आहेत. महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ठरवत असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत असतो. पहा तुमच्या शहरांतील आजचे दर काय आहेत ते पाहा.

शहरांतील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

आज शहरांतील पेट्रोलचे दर : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 51 पैसे, तर डिझेलचा दर 92 रुपये 02 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 107 रुपये 95 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 04 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 22 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 73 पैसे आहे. सोलापूर पेट्रोलचा दर 106 रुपये 77 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 29 पैसे आहे

डझेलची प्रतिलिटर किंमत: तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडल्यानंतर त्याची मूळ किंमत नक्की केली जाते. इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेणे गरजेचे असते. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवण्यात येते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल करण्यात येतो. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या म्हणून ओळखल्या जातात.

इंधनाच्या किमती कशा ठरतात :तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडल्यानंतर त्याची मूळ किंमत ठरवली जाते. इंधनाची मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. त्यामुळे दरोज किंमतीत बदल केला जातो.

हेही वाचा: Today Petrol Diesel Rates पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घ्या कुठे मिळेल स्वस्त पेट्रोल

ABOUT THE AUTHOR

...view details