मुंबई : दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. सध्या भारत जागतिक तेल उत्पादक देशांकडून कच्चे तेल खरेदीवर भर दिला जात आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता.
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर इंधन आयात सुरु केली :2021-22 मध्ये ही इंधन आयात करणाऱ्या देशांची संख्या 39 इतकी झाली आहे. कोलंबिया, रशिया, लिबिया यासह छोट्या राष्ट्रांकडूनही भारताने इंधन आयात सुरु केल्याचे दिसून येते. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तेल विपणन कंपन्याकडून भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर केले जातात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसून येते.
तुमच्या शहरांतील आजचे दर : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 42 पैसे, तर डिझेलचा दर 92 रुपये 33 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 07 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 106 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 04 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 37 पैसे आहे. देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात अगदी किंचीतसा बदल झाला आहे.
इंधनाच्या किमती कशा ठरतात :तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडल्यानंतर त्याची मूळ किंमत ठरवली जाते. इंधनाची मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. त्यामुळे दररोज किंमतीत बदल केला जातो.
हेही वाचा : Today Horoscope : 'या' राशींच्या लोकांना मिळणार परदेशात व्यवसाय करण्याची संधी, वाचा, आजचे राशीभविष्य