मुंबई :संपूर्ण आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा दर घसरला आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 57,038 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. तर सोमवारी सोन्याचा हा दर 57455 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यामुळे आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम ४१७ रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे सोने आता प्रति दहा ग्रॅम ४१७ रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून पाहिले तर सोने खूपच स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.
सोने-चांदीचे आतापर्यंतचे उच्चांकी दर :सध्या सोन्याचा भाव 1,844 रुपये प्रति 10 ग्रॅम ने स्वस्त झाला आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती.त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. तर चांदी 8,260 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. एप्रिल २०११ मध्ये चांदीने ७५,००० रुपयांचा उच्चांक गाठला होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारी चांदीचा भाव 66740 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर सोमवारी या चांदीचा भाव 67606 रुपये प्रति किलो होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात चांदीच्या दरात प्रतिकिलो ८६६ रुपयांची घसरण झाली होती.
आज सोन्याचे दर : 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,250, 8 ग्रॅम ₹42,000, 10 ग्रॅम ₹52,500, 100 ग्रॅम ₹5,25,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹₹5,723, 8 ग्रॅम ₹45,784, 10 ग्रॅम ₹57,230, 100 ग्रॅम ₹5,72,300 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,350, मुंबईत ₹52,500 दिल्लीत ₹52,650 कोलकाता ₹52,500 हैदराबाद ₹52,500 आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात.
आज चांदीचे दर : आज चांदी 1 ग्रॅम ₹70, 8 ग्रॅम ₹560, 10 ग्रॅम ₹700, 100 ग्रॅम ₹7,000, 1 किलो ₹70,000 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹720, मुंबईत ₹700, दिल्लीत ₹700, कोलकाता ₹700, बंगळुरू ₹720, हैद्राबाद ₹720 आहेत. सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ ग्राहकांना परवडत नसल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी वेट अन वॉचची भूमिका घेतली आहे.
Valentine Day 2023 : नवऱ्यासाठी बनवले सोन्याचे दिल, सूरतच्या तरुणीचे अनोखे व्हॅलेन्टाईन गिफ्ट