मुंबई : मागील काही दिवस सोने-चांदीच्या दराला झळाळी मिळाली होती. सातत्याने सोने चांदीने विक्रमी दर गाठले होते. मात्र, शनिवारी सोने चांदीच्य़ा दरात अल्प घट नोंदवली गेली होती. शुक्रवारी सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा भाव 57,538 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीचा भाव 67,516 रुपये प्रति किलो होता. शनिवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,310 रुपये होता. सोन्यात 550 रुपयांची घसरण झालेली दिसून येत आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,450 रुपये आहे. शुक्रवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या किमतीत ५५० रुपयांनी घट झाली होती. २४ कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमचा व्यवहार ५७,१६० रुपयांवर झाला होता. चांदीच्या भावातही ५५० रुपयांनी घट झाली होती.
22 कॅरेट सोन्याची किंमत : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,260, 8 ग्रॅम ₹42,080, 10 ग्रॅम ₹52,600, 100 ग्रॅम ₹5,26,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,738, 8 ग्रॅम ₹45,904, 10 ग्रॅम ₹57,380, 100 ग्रॅम ₹5,73,800 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर, प्रमुख शहरात आजची किंमत, कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,400, मुंबईत ₹52,600, दिल्लीत ₹52,750, कोलकाता ₹52,600, हैदराबाद ₹52,600 आहेत.