मुंबई: 2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. म्हणजे 10 पैशांपेक्षा कमी आणि आज बिटकॉइनची किंमत 14 लाखांच्या आसपास आहे. आता तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता की रोलर कोस्टर राइड बिटकॉइनने या 14 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना किती दिला आहे. पुढील काळात व्यवहारांमध्ये, गुंतवणूकीत क्रिप्टोचलनाचा मोठा बोलबोला असण्याची शक्यता आहे. तर क्रिप्टोकरन्सीचे मागील काही दिवसांचे दर जाणून घेऊया. आज शुक्रवार दि. 10 रोजी तारखेला बीटकॉइनची किंमत 18,04,872.80 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,28,211.23 रूपये आहे. बायनान्सची किंमत 1,33,855 रूपये आहे. तेच काल गुरूवारी दि. 9 रोजी हीच बीटकॉइनची किंमत 19,00,300.36 आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,36,557.38 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,952.07 रूपये होती.
दीर्घकाळासाठी गुंतवणूक: गुंतवणूकदारांना फसव्या लोकांपासून पैसे गमावण्यापासून अधिक चांगले संरक्षण मिळेल. 2023 च्या सुरुवातीलाच बिटकॉईनमध्ये 4.3 टक्के वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगातील क्रिप्टोकरन्सीत 7 दिवसांची अस्थिरता होती. ऑक्टोबर 2018 पासून कधीही न पाहिलेल्या पातळीपर्यंत क्रिप्टोकरन्सी घसरली आहे. क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते.