महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Financial Planning : तुमच्या पैशांचे आर्थिक नियोजन कसे कराल? - आर्थिक नियोजन

नोकरी किंवा व्यवसाय करत असताना कष्टाने कमावलेले पैसे वाचवणे ( Saving hard-earned money ) ही मुख्य गोष्ट आहे. जसे की तुमची बचत मुदत ठेवींमध्ये ( fixed deposits ) ठेवणे किंवा गुंतवणुकीचे विवध पर्याय निवडणे गरजेचे आहे. यासाठी काही टिप्स

Financial Planning
Financial Planning

By

Published : May 9, 2022, 12:23 PM IST

Updated : May 9, 2022, 12:58 PM IST

हैदराबाद :नोकरी किंवा व्यवसाय करत असताना कष्टाने कमावलेले पैसे वाचवणे ( Saving hard-earned money ) ही मुख्य गोष्ट आहे. जसे की तुमची बचत मुदत ठेवींमध्ये ( fixed deposits ) ठेवणे किंवा गुंतवणुकीचे विवध पर्याय निवडणे गरजेचे आहे. ज्यांनी नुकतीच कमाई सुरू केली आहे. तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे यातून आपल्याला सुरक्षित परतावा मिळाला पाहिजे. यासाठी काही टिप्स

टर्म पॉलिसी :

तुम्हाला जीवन विमा पॉलिसीची ( life insurance policy ) आवश्यकता आहे. पैसे कमवणारे असल्याने, काही अनुचित घटना घडल्यास तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो. यासाठी एक टर्म पॉलिसी आवश्यक आहे. तुमच्या 10 ते 12 वर्षांच्या उत्पन्नाच्या टर्म पॉलिसीला प्राधान्य द्या.

ऑनलाईन भूलथापांना बळी पडू नका

ऑनलाईन फ्रॉड तसेच स्कॅमच्या ईमेलपासून सावध राहा. तुम्ही मोठी लॉटरी जिंकली आहे आणि लॉटरीचे पैसे तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी 50,000 रुपये ट्रान्सफर करा अशा आशयाचा ई - मेल तुम्हाला आल्यास त्याला बळी पडू नका. यासाठी कृपया तुमचे बँक खाते, आधार आणि फोन नंबरचे तपशील शेअर करणारे मेल येतील. अशा भूलथापांकडे आकर्षित होणे स्वाभाविक आहे. मात्र, हा हा घोटाळा आहे हे तुम्हाला कळत नसेल, तर तुम्ही खऱ्या संकटात सापडू शकता. हॅकर्स खाते हॅक करतील. अशा गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगणे चांगले.

खोटी आश्वासनांना भूलू नका

तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या चौपट कमवू शकता आणि तुमचे पैसे लगेच दुप्पट होईल अशा कंपन्यांनी दिलेल्या फसव्या आश्वासनांना बळी पडू नका. बँकासुद्धा तुमची रक्कम 10 वर्षांनी दुप्पट करू शकतात. परंतु, तुम्ही अशा आश्वासनांवर विश्वास ठेवल्यास, तुमचे पैसेही जातील. आणि तुम्हाला आयुष्यभराचा पश्चात्ताप होईल. अशा कंपन्यांकडून तुमचे पैसे वसूल करणे हे एक कठीण काम असेल. आणि कंपनीभोवती फेऱ्या मारूनही ते व्यर्थ ठरेल. कारण तुम्ही थकून जाल पण परतावा मिळणार नाही.

चांगल्या योजना

बँकेच्या व्याजापेक्षा जास्त पैसे मिळविणाऱ्या योजना फार कमी आहेत. त्या मर्यादित योजना ब्राउझ करा. तुमचे पैसे बँका किंवा पोस्ट ऑफिस डिपॉझिटमध्ये गुंतवणे हे एक शहाणपणाचे पाऊल असू शकते. आजकाल काही वित्तीय संस्था ठेव योजना ऑफर करत आहेत, तुम्ही त्याचा विचार करू शकता.

आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार रहा

कधीकधी तुम्हाला काही अनपेक्षित परिस्थितींना सामोरे जावे लागत असल्याने आयुष्य खूप अप्रत्याशित असते. अशा परिस्थितीत, आपण काही पैसे उधार घेण्यासाठी मित्र किंवा कुटुंबावर अवलंबून असतो. त्याऐवजी, तुम्हाला संकटांचा सामना करण्यासाठी आपत्कालीन निधी जमा करणे आवश्यक आहे. दुसर्‍या शब्दांत, तुमच्या हातात काही हार्ड कॅश असणे आवश्यक आहे.

हेही वाचा -Life after retirement : निवृत्तीनंतरच्या जीवनाची योजना अन् त्याचा आनंद घेण्यास काय करावे; वाचा काही टिपा

Last Updated : May 9, 2022, 12:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details