मुंबई:2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि कार्यक्षम चलन व्यवस्थापनासाठी आरबीआय चालू आर्थिक वर्षात डिजिटल चलन सादर करेल. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. त्याची किंमत सुमारे 439.77 दशलक्ष डॉलर होती. त्याचे वर्चस्व सुमारे 42.32 टक्के होते. यात दिवसभरात 0.16 टक्क्यांनी घट झाली. आज बीटकॉइनची किंमत 19,23,818 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,33,386 रूपये आहे. बायनान्सची किंमत 25,916 रूपये आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये बिटकॉइन व्हॉल्यूम अंदाजे 26.77 दशलक्ष डॉलर होते, गेल्या 24 तासात 4.12 टक्क्यांनी वाढले.
बीटकॉइन इथेरिअमची किंमत व्यवहार गोपनीय: आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किवा कंपनीची मक्तेदारी नाही.