मुंबई - संपूर्ण भारतीय असलेले 5 जीचे तंत्रज्ञान रिलायन्स जिओकडे तयार असल्याचे अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले आहे.
जिओचे स्वदेशी 5जी तंत्रज्ञान तयार; मुकेश अंबानींची मोठी घोषणा - 5G technology in India
रिलायन्सच्या ऑनलाइन वार्षिक सभेत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, की स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यानंतर भारतामध्ये तयार झालेले 5जी तंत्रज्ञान लॉन्च करण्यात येणार आहे
रिलायन्सच्या ऑनलाइन वार्षिक सभेत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, की स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यानंतर भारतामध्ये तयार झालेले 5जी तंत्रज्ञान लॉन्च करण्यात येणार आहे. 4जी हे 5जी मध्ये अद्ययावत करणे सोपे असल्यााचे यावेळी अंबानी यांनी सांगितले.
एकदा भारतामध्ये सिद्ध झाल्यानंतर जिओ 5जी तंत्रज्ञानाची चांगल्या पद्धतीने जगात निर्यात करू शकणार आहे. दूरसंचार क्षेत्रात स्वदेशी कंपन्यांनी पुढे यावे, यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्सची घोषणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चिनी कंपनी हुवाईचे 5 जी तंत्रज्ञान हे देशाच्या संरक्षणाला धोका आहे, असा विविध सरकारी संस्थांनी यापूर्वी अहवाल दिला आहे. चीनबरोबरील तणावाच्या स्थितीमुळे स्वदेशी 5जी तंत्रज्ञानाची देशाला गरज निर्माण झाली आहे.
गुगल जिओमधील 7.7 टक्के हिस्सा घेणार आहे. त्यासाठी गुगल रिलायन्स ला 33,737 कोटी रुपये देणार आहे. याची घोषणााही रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.