मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी ( Domestic stock market ) सलग तिसऱ्या दिवशी तेजी राहिली आणि सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 619 अंकांची वाढ ( Sensex up 619 points ) करून 57,000 चा टप्पा पार केला. तीस कंपन्यांचा समावेश असलेला BSE सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात 619.27 अंकांनी वाढून 57,477.06 अंकांवर ( BSE Sensex Reached 57,477.06 points ) पोहोचला.
त्याचप्रमाणे NSE चा मानक निर्देशांक निफ्टी देखील 189.15 अंकांच्या वाढीसह 17,118.75 अंकांवर ( Nifty at 17,118.75 points ) व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, मारुती सुझुकी, इन्फोसिस, पॉवर ग्रिड आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश होता. दुसरीकडे, डॉ. रेड्डीज आणि सन फार्मा यांचे शेअर्स तोट्यात होते.