नवी दिल्ली - देशातील शेअर बाजार आजपासून चार दिवस बंद ( stock market holidays ) राहणार आहे. देशातील सर्वात मोठा जुना शेअर बाजार असलेले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) गुरुवार ते रविवार बंद राहणार आहे. मुंबई शेअर मार्केटचे पुढील ट्रेडिंग सोमवारपासून ( 15 april 2022 holiday ) सुरू होणार आहे.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंतीनिमित्त ( 14 april 2022 holiday ) आज शेअर बाजाराला ( share market today ) सुट्टी आहे. तर 15 एप्रिल 2022 रोजी गुड फ्रायडेमुळे सुट्टी ( good friday 2022 ) असणार आहे. शनिवार आणि रविवार हे शेअर बाजारात साप्ताहिक सुट्ट्या ( nse holidays 2022 ) असतात.
MCX आणि NCDEL मध्येही सुट्टी-नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज लिमिटेडदेखील ( NCDEL holidays ) आज शेअर बाजार पहिल्या सत्रात बंद राहणार आहे. तर दुसऱ्या सत्रात एनएसईमध्ये व्यवहार होईल. एनएसईमध्ये 15 एप्रिलला व्यवहार पूर्णपणे बंद होणार आहे. या वर्षी शनिवार आणि रविवार वगळता बीएसई आणि एनएसईमध्ये एकूण 13 दिवस सुट्ट्या आहेत. कमोडिटी मार्केटमध्ये ( MCX ) व मल्टी कमोडिटी इंडेक्स ऑफ इंडियामध्ये (MCX) 14 एप्रिल रोजी पहिल्या ट्रेडिंग सत्रात सुट्टी असणार आहे. दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात बाजार सुरू राहणार आहे.