हैदराबाद Indian Startup Ecosystem : सध्या भारतात स्टार्ट अप उद्योगानं अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेची भरभराट होत आहे. केंद्र सरकारनं 16 जानेवारी 2016 ला स्टार्टअप इंडिया हा उपक्रम सुरू केला. त्यामुळं अनेक उद्योग देशात सुरू करण्यात आले आहेत. अनेकत तरुण उद्योगाकडं वळल्यामुळं देशात एक इकोसिस्टीम सुरू झाली आहे. या भारतीय इकोसिस्टीमनं अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होऊन आर्थिक वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. देशात 5 एप्रिल 2016 ला स्टँड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली होती. स्टार्टअप इंडिया योजनेनुसार पात्र कंपन्यांना डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) च्या माध्यामातून स्टार्टअप म्हणून मान्यता मिळते.
16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस :केंद्र सरकारनं देशात 16 जानेवारीला स्टार्टअपयोजा सुरू केली. त्यानंतर दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2021 मध्ये 16 जानेवारी हादिवस स्टार्टअप दिवस म्हणून जाहीर करण्यात आला होता. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येते. स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. त्यामुळं स्टार्टअप योजनेत उद्योजकांना प्रोत्साहन देत रोजगारांच्या संधी निर्माण करता येतात.
कशी आहे भारतीय स्टार्टअप उद्योगांची स्थिती :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजना सुरू केल्यानंतर भारतीय उद्योगाला चालना मिळाल्याचा दावा करण्यात येतो. केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारत योजना आणून त्यामाध्यमातून उद्योगाला मोठी चालना दिली आहे. त्यामुळंच स्टार्टअप योजनांच्या माध्यमातून देशात अनेक उद्योग उभे राहत आहेत. स्टार्टअपसाठी भारत हा जगातील आघाडीचा देश आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतीय उद्योग जगतानं आघाडी घेतली आहे. त्यामुळं स्टार्टअपमध्ये भारत हा तिसरा देश असल्याचा दावा करण्यात येत आहे. सरकारच्या मदतीनं भारतीय स्टार्टअप उद्योग जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवत आहेत.