नवी दिल्ली : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना धक्का बसला आहे. अदानी समूहाने 413 पानांच्या उत्तरात हिंडेनबर्गच्या अहवालाचे खंडन केले असले तरी, या अहवालाचा व्यवसाय आणि शेअर्सवर परिणाम प्रकर्षाने दिसून येत आहे. यामुळे गौतम अदानी यांना ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सने जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतूनही बाहेर काढले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये अदानी आता ११ व्या क्रमांकावर घसरले आहे. या अहवालानंतर गौतम अदानी यांचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत अदानी समुहाला सुमारे 36.1 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. इतकंच नाही तर कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे अदानी समूहाला सुमारे 65 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे.
अदाणींच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण :अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. हा अहवाल 24 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध होताच अदानी समूहाच्या अनेक शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. अदानी समूहाच्या साम्राज्यात झालेल्या उलथापालथीनंतर त्याच्या नेटवर्थवरही परिणाम झाला आहे. यानंतर अदानी समूहाने हिंडेनबर्ग रिसर्चच्या 88 प्रश्नांना ४१३ पानांत उत्तरे दिली असून, बदनामी करण्यासाठी हा अहवाल समोर आणला असल्याचे सांगितले.
अदाणींकडे राहिली फक्त 'इतकी' संपत्ती :मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स इतक्या वेगाने घसरले की ते टॉप 10 च्या यादीतून बाहेर पडले आणि ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये 11 व्या स्थानावर गेले. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये अदानी आता ११ व्या क्रमांकावर दिसत आहे. त्यांची संपत्ती आता ८४.४ अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे. या यादीत मुकेश अंबानी अदानी यांच्या मागे आहेत. त्यांची संपत्ती $82.2 अब्ज आहे