वडोदरा: ग्राहक मंचाने वैद्यकीय दाव्यांशी संबंधित एक मोठा आदेश पारित केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, एखादी व्यक्ती 24 तासांपेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात दाखल असतानाही वैद्यकीय दावा करू शकते. रहिवासी रमेश चंद्र यांच्या याचिकेवर वडोदराच्या ग्राहक मंचाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, नवीन तंत्रज्ञान आल्यापासून काही वेळा रुग्णांवर कमी वेळेत किंवा रुग्णालयात दाखल न होता उपचार केले जातात. रुग्णाला २४ तास रुग्णालयात दाखल करणे आवश्यक नाही, त्यामुळे विमा कंपनीला विम्याची रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले.
काय आहे संपूर्ण प्रकरण : वडोदरा येथील रहिवासी असलेल्या रमेश चंद्र जोशी यांनी 2017 मध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कारण कंपनीने त्यांचा विमा दावा (क्लेम) देण्यास नकार दिला होता. वास्तविक, जोशी यांच्या पत्नीला आजारी अवस्थेत वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलने त्यांना डिस्चार्ज दिला. यानंतर जोशी यांनी विमा कंपनीकडे ४४,४६८ रुपयांचा वैद्यकीय दावा दाखल केला. जो नियमानुसार २४ तास रुग्णाला रुग्णालयात दाखल केले नाही, असे कारण देत, विमा कंपनीने फेटाळला.