नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर अमेरिकन संशोधन कंपनी हिंडेनबर्गचा अहवाल आला आणि अदानींच्या शेअर्समध्ये खळबळ उडाली. त्या दिवसापासून अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स 50 टक्क्यांनी घसरले आहेत. या अहवालानंतर अदानी समूहाचे बाजार भांडवल 10 लाख कोटींनी कमी झाले आहे. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाचे मार्केट कॅप 19.2 लाख कोटी रुपये होते. मात्र अहवाल आल्यापासून बरंच काही घडलं आहे. हा संपूर्ण घटनाक्रम या टाइमलाइन मार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
24-31 जानेवारी : अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी अदानी समूहावरील आपला अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील फेरफार, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसारखे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, अदानी समूह या आरोपांचे सातत्याने खंडन करत असून समूह हिंडेनबर्गवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र एवढे करूनही अदानी एंटरप्रायझेसला गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकता आलेला नाही. अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.
दोन दिवसांची घसरण 4 लाख कोटीज्या दिवशी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाला त्या दिवशी अदानी समूहाच्या व्हॅल्युएशन मध्ये 85 टक्यांची घसरण झाली. दुसर्या दिवशी अदानी समूहाशी संबंधित संस्थांचे बाजार भांडवल सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी घसरले. अदानी समूहाने हिंडेनबर्ग रिसर्चला उत्तर देत हा अहवाल निराधार असल्याचे सांगितले. तथापि हिंडेनबर्गने आपण आपल्या अहवालावर ठाम असल्याचे म्हटले. यानंतर अदानीचा शेअर घसरत राहिला. त्यामुळे शेअर्सच्या बाजार भांडवलात दोन दिवसांची घसरण 4 लाख कोटी रुपयांची झाली. अदानी एंटरप्रायझेसने बाजारातून पैसे उभे करण्यासाठी 20,000 कोटींचा एफपीओ आणण्याची घोषणा केली होती. अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओ मध्ये पहिल्या दिवशी 1 टक्के सबस्क्रिप्शन पाहिले गेले. यानंतर अबू धाबीच्या इंटरनॅशनल होल्डिंगने अदानीच्या समर्थनार्थ एफपीओमध्ये 400 दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले. अशाप्रकारे अदानी एंटरप्रायझेसचे एफपीओ 31 जानेवारीपर्यंत पूर्णपणे सबस्क्राइब झाले.