हैदराबाद:आरोग्य विमा पॉलिसी आजारपणामुळे तुमचा खीसा रीकामा होण्यापासून तुमचे संरक्षण करेल. अलीकडे, वैद्यकीय धोरणे बदलत्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केले जातात. बचत आणि पाॅलीसी बाबत अधिक जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला आजारपणासाठी रुग्णालयात दाखल केले असेल आणि त्यासाठी पॉलिसीच्या रकमेचा दावाही केला असेल. विमा संरक्षणाशिवाय (Health insurance cover) तुम्हाला पुन्हा रुग्णालयात जावे लागले तर ते कठीण होईल. खिशातून पैसे खर्च करावे लागू शकतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, तुम्ही पॉलिसीचे नुतणीकरण करणे आवश्यक आहे. याला रिस्टोरेशन किंवा रिफिल बेनिफिट म्हणतात. विमा उतरवलेली मर्यादा संपूनही, पॉलिसी तिच्या सामान्य स्थितीत परत येईल. हाच या सुविधेचा मोठा फायदा आहे.
पॉलिसी कशी निवडावी: एका उदाहरणावरून हे समजुन घेऊ समजा कुमारची 5 लाख रुपयांची विमा पॉलिसी आहे. आणि काही आजारामुळे तीन महिन्यांनंतर त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्याने 5 लाख रुपयांची विमा रक्कम वापरली. त्यानंतर पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी त्याला आणखी नऊ महिने वाट पाहावी लागेल. यादरम्यान, जर त्याला दुसर्या आजारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आणि 2 लाख रुपये खर्च करावे लागले, तर त्याच्या खिशातून पैसे भरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, जर कुमारने त्यांच्या पहिल्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याने त्यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण केले असते किंवा ती पुन्हा भरली असती, तर तो घरी परतताच त्यांच्या खात्यात 5 लाख रुपये आले असते.
पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावे लागले तर: समजा कुमारला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये जावे लागले तर कोणतीही अडचण येणार नाही. याची खात्री त्याला झाली असती. परंतु पॉलिसी नूतनीकरण सुविधा किती वेळा उपलब्ध आहे हे विमा कंपनी आणि निवडलेल्या पॉलिसीवर अवलंबून असते. त्यामुळे पॉलिसीधारकाने पॉलिसी घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवले पाहिजे की, विमा मर्यादा संपल्यानंतरच पॉलिसीचे नूतनीकरण करणे आवशक्य आहे. उदाहरणार्थ, पॉलिसीधारक 5 लाख रुपयांची पॉलिसी घेतो आणि त्यातील फक्त 4 लाख रुपये हॉस्पिटलायझेशनसाठी खर्च करतो, तर उर्वरित 1 लाख रुपये विमा कंपनी आणि पॉलिसीच्या अटीं पाळुन; पुढील पॉलिसी मध्ये वापरण्याची सुविधा देऊ शकतात.