महाराष्ट्र

maharashtra

Gold Hallmark : सोन्याच्या दागिन्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, आता सहा अंकी हॉलमार्क लागू होणार

By

Published : Mar 4, 2023, 10:18 AM IST

सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी - विक्रीच्या नियमांमध्ये सरकारने बदल केले आहेत. सरकारने आता सहा अंकी हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी - विक्री अनिवार्य केली आहे. हे नवे नियम १ एप्रिलपासून लागू होतील.

Gold
सोने

नवी दिल्ली : केंद्र सरकारने हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्री आणि खरेदीबाबत नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, सध्या लागू असलेल्या चार हॉलमार्कऐवजी आता सहा हॉलमार्कच्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी - विक्री करावी लागणार आहे. 31 मार्च 2023 नंतर, हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने आणि कलाकृती विकल्या जाणार नाहीत. नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील.

गोल्ड हॉलमार्किंग हा सोन्याच्या शुद्धतेचा पुरावा : अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सूक्ष्म स्तरावर युनिट्समध्ये गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उत्पादन प्रमाणन योजनांमध्ये BIS प्रमाणन/किमान मार्किंग शुल्कावर 80 टक्के सवलत देईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. गोल्ड हॉलमार्किंग हा सोन्याच्या शुद्धतेचा पुरावा आहे. 16 जून 2021 पर्यंत हे ऐच्छिक स्वरूपाचे होते. त्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने सोन्याच्या ओळखीबाबत नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात 256 जिल्ह्यांमध्ये हे बंधनकारक करण्यात आले आणि दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्हे जोडण्यात आले आणि एकूण संख्या 288 झाली. आता आणखी 51 जिल्हे जोडले जात आहेत.

1 एप्रिलपासून बंधनकारक : अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, '1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) अनिवार्य करण्यात आले आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव राही खरे म्हणाल्या, 'ग्राहकांच्या हितासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे की, 31 मार्चनंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नाही.'

हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन काय? : त्या म्हणाल्या की, सध्या चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन वापरले जात आहेत. दर्जेदार उत्पादनासाठी ग्राहकांच्या मागणीमुळे ज्या जिल्ह्यांमध्ये हे अद्याप बंधनकारक नाही अशा जिल्ह्यांमध्येही हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या वस्तू देशभर विकल्या जात आहेत. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक हा सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे ज्यामध्ये संख्या आणि अक्षरे असतात. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) हॉलमार्किंगच्या वेळी दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्याला दिले जाते आणि प्रत्येक तुकड्यासाठी ते वेगळे असते.

हेही वाचा :Wheat prices impact on intrest rate : गव्हाच्या वाढत्या किंमतीचा तुमच्या व्याजदरावर कसा परिणाम होतो ? जाणून घ्या सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details