महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 27, 2023, 3:42 PM IST

ETV Bharat / business

Gautam Adani 7th Richest Person : शेयर पडल्याचा गौतम अदानींना फटका, अब्जाधिशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावरुन सातव्या स्थानावर घसरण

हिंडनबर्ग रिपोर्टच्या नुसार जागतिक श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे चौथ्या स्थानावरुन सातव्या क्रमांकावर गेले आहेत. तर रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 11 व्या स्थानावर झेप घेतली आहे. 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारे उद्योगपती म्हणून गौतम अदानींचा समावेश करण्यात आला होता.

Gautam Adani Richest Person
उद्योगपती गौतम अदानी

नवी दिल्ली - शेयर पडल्यामुळे जागतिक अब्जाधिशांच्या यादीत मोठी घसरण झाली आहे. उद्योगपती गौतम अदानींनाही शेयर पडल्याचा मोठा फटका बसला आहे. गौतम अदानी सर्वात श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावरुन आता सातव्या क्रमांकावर गेले आहेत. फोर्ब्सच्या रियल टाइम बिलेनियर्स इंडेक्सने ही यादी जाहीर केली आहे. शेयर पडल्यानंतर गौतम अदानींच्या संपत्तीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

कोण आहे प्रथम क्रमांकावर :हिंडनबर्ग रिपोर्टच्या नुसार जगातील अब्जाधिशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर बर्नार्ड अरनॉल्ट हे असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती 215 अब्ज डॉलर असल्याचे हिंडनबर्ग रिपोर्टने जाहीर केले आहे. त्यामुळे बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर गौतम अदानी हे जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असल्याचे या यादीत नमूद करण्यात आले आहे.

कोणी पटकावले श्रीमंत अब्जाधिशांच्या यादीत नाव :बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एलन मस्क यांनी स्थान पटकावले आहे. त्यांची सपंती 170 अब्ज असल्याचे हिंडनबर्ग रिपोर्टने नमूद केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमेझॉनचे सहसंस्थापक झेफ बेजोस हे आहेत. त्यांची संपती 122.4 अब्ज असल्याचे या यादीत नमूद करण्यात आले आहे.

लॅरी एलिसन यांना गौतम अदानीचे शेयर पडल्याचा फायदा :जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी यांनी 2022 मध्ये चौथ्या स्थानांवर स्थान पटकावले होते. सर्वाधिक ककमाई करणारे उद्योगपती म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र अदानी यांच्या 9 कंपन्यांचे शेयर घसरल्याने त्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे गौतम अदानी यांच्या नेटवर्थ संपतीमध्येही घसरण झाली. त्याचा सगळ्यात मोठा फायदा लॅरी एलिसन यांना झाला. लॅरी एलिसन यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने त्यांनी या यादीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

मुकेश अंबानींची इतकी आहे संपती :हिंडनबर्ग रिपोर्टच्या नुसार आठव्या स्थानांवर कार्लोस स्लिम यांनी बाजी मारली आहे. त्यांची संपत्ती 93 अब्ज आहे. तर नवव्या स्थानांवर लॅरी पेज हे असून त्यांची संपत्ती 85 अब्ज असल्याचे या रिपोर्टनुसार जाहीर करण्यात आले आहे. दहाव्या स्थानांवर फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स हे आहेत. त्यांची संपत्ती 83.9 अब्ज आहे. तर भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची संपत्ती 83.1 अब्ज असून त्यांना जागतिक श्रीमंतांच्या यादीत 11 वे स्थान मिळाले आहे.

हेही वाचा - PM Modi Pariksha Pe Charcha : 'परीक्षा पे चर्चा' मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ही माझीही परीक्षा आहे'

ABOUT THE AUTHOR

...view details