हैदराबाद: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ( Unified Payments Interface ) च्या आगमनाने, बँकिंग आणि पेमेंटच्या पद्धती बदलल्या आहेत. ज्यांना पैसे हस्तांतरित करायचे आहेत ते बँक खात्याशी जोडलेल्या फोन नंबर किंवा UPI आयडीद्वारे काही मिनिटांत पैसे हस्तांतरित करतात. परंतु UPI वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण तुमचे खाते हॅक होण्याचा धोका देखील आहे.
येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, UPI आयडी टाकताना थोडी चूक झाली तर पैसे दुसऱ्याच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. म्हणून, एखाद्या व्यक्तीला प्रथमच पैसे हस्तांतरित करताना, मोठी रक्कम पाठवण्याऐवजी, अगोदर एक रुपया पाठवून बघावा. जेनेकरुन तो एक रुपया योग्य व्यक्तीला पोहचला असेल, तरच संपूर्ण रक्कम UPI द्वारे पाठवू शकता.
कोणतीही खरेदी करताना आपण QR कोडद्वारे पैसे देतो. आपण UPI ॲपद्वारे QR कोड स्कॅन करताच, दुकानदाराचा तपशील येतो. म्हणून, QR कोडद्वारे हस्तांतरण करण्यापूर्वी, दुकानदाराचे तपशील तपासण्याची खात्री करा. क्यूआर कोड अनेकदा दुकानांच्या भिंतींवर चिकटवले जातात. अलीकडच्या काळात, फसवणूक करणाऱ्यांनी दुकानांमध्ये चुकीचे QR कोड पेस्ट केल्याची प्रकरणे समोर आली आहेत, त्यानंतर ग्राहकांचे पैसे दुकानदाराच्या खात्यात गेले नाहीत. ते पैसे फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात ( Cyber fraud ) गेले आहेत.