महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Budget 2023 : बजेट 2023, केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अपेक्षा वाढल्या, शेअर बाजारात येणार तेजी.. - अर्थसंकल्प तज्ज्ञांचे मत

लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्याच्या अवघ्या महिनाभर आधी शेअर बाजारात अनेक घडामोडी होत असतात. हा ट्रेंड लक्षात घेऊन शेअर बाजारातील तज्ज्ञांनी एक अहवाल जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की 10 पैकी 6 अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एक महिना आधी बीएसई सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. जाणून घेऊयात काय आहे अहवाल..

Fast trend in run up month of budget 2023 Budget Expectations and Key Announcements Budget Expert Opinions
बजेट 2023, केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अपेक्षा वाढल्या, शेअर बाजारात येणार तेजी..

By

Published : Jan 19, 2023, 1:03 PM IST

नवी दिल्ली : शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, मागील 10 अर्थसंकल्पांपैकी 6 अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच्या एक महिना आधी शेअर बाजारात तेजी होती. मार्केट डेटाचा हवाला देऊन, मीडिया रिपोर्ट्समधील तज्ञांनी म्हटले आहे की, 2016 मध्ये, बजेटच्या एका महिन्याच्या कालावधीत बीएसई सेन्सेक्समध्ये 7.5 टक्के वाढ दिसून आली होती. यावेळी बाजाराची स्थिती काय असेल, तेजी असेल की मंदी, याचा अंदाज तज्ज्ञ आपापल्या परीने लावत आहेत.

तीन वर्षे बाजारात नव्हती तेजी:2013 मध्ये बेंचमार्क 6.2 टक्क्यांनी घसरला होता, तर 2012 मध्ये तो 3.8 टक्क्यांनी घसरला. 2020 मध्येही त्यात 3.8 टक्क्यांनी घट झाली होती. बेंचमार्क 2014 मध्ये 0.8 टक्के आणि 2015 मध्ये 0.7 टक्क्यांनी घसरला होता. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच्या महिन्यात बीएसई सेन्सेक्सने चांगली कामगिरी केली होती. 2017 मध्ये 5.7 टक्के आणि 2018 मध्ये 6.2 टक्के बाजारातील तेजीमध्ये वाढ झाली. त्याचप्रमाणे, बेंचमार्क 2021 मध्ये 1.5 टक्के आणि 2019 मध्ये 0.6 टक्क्यांनी वाढला होता.

तज्ञ काय म्हणतात?:एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक संशोधक नागराज शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, 'निफ्टीमधील सध्याचा वाढीचा ट्रेंड जानेवारीच्या अखेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. 2012 पासूनच्या निफ्टीच्या ट्रेंडचा दाखला देत त्यांनी हे विश्लेषण करून सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, निफ्टीमध्ये 18,500-18,700 पातळीच्या आसपास लक्षणीय बदल झाला आहे. विविध क्षेत्रांचा दाखला देत शेट्टी म्हणाले की, आयटी क्षेत्र सध्या चांगली कामगिरी करत आहे. तर फार्मा सेक्टर हा अंडर परफॉर्मर आहे. आर्थिक वर्ष 23 च्या अर्थसंकल्पावर, IIFL सिक्युरिटीजचे सीईओ संदीप भारद्वाज म्हणाले, 'बहुधा, सरकार या वर्षीही असे बजेट आणेल जे सरकारच्या विकासकामांचे लक्ष्य पूर्ण करेल. यासोबतच बाजारात तेजी येण्याची आशा आहे.

जागतिक घटकांचा बाजारावर परिणाम होऊ शकतो:केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 अवघ्या काही दिवसांवर असताना, यूएस फेडरल रिझर्व्हच्या दर वाढीच्या अपेक्षेमुळे बीएसई बेंचमार्क अस्थिर होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे भू-राजकीय परिस्थिती अजूनही अस्थिर आहे. बजेट जसे जसे जवळ येत जाईल तसे शेअर बाजार तेजीचा कल दाखवू शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 2022 मध्ये, बीएसई बेंचमार्क 4.4 टक्क्यांनी तेजीत होता. या स्थितीत या महिन्यात एकूणच कल कसा आहे हे पाहावे लागेल.

हेही वाचा: Budget 2023 मी देखील मध्यमवर्गीय आहे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांची स्पष्टोक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details