महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Gold rate rises : लग्नाचे बजेट कोलमडणार तरीही सोने खरेदीला ग्राहकांची गर्दी; जाणून घ्या आजचे दर

काही दिवसांपूर्वी 51 वर असणारे सोने आज तब्बल 54 हजार पाचशे इतक्या किमतीचे झालेला आहे. मात्र लग्नसराईचे दिवस असताना तिथे झपाट्याने वाढ होत असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास होताना दिसून येतो आहे. लग्नसराई असल्याने आम्हाला सोने घेतल्याशिवाय पर्याय नाही, असे देखील ग्राहकांचे म्हणणे आहे. सोने चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates in India) असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीचे दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. ( Gold rate rises ) आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या.

Gold rate rises
सोन्याच्या भावाने घेतली उसळी

By

Published : Jan 8, 2023, 7:48 AM IST

सोन्याच्या भावाने घेतली उसळी

ठाणे :उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. ( Gold rate rises ) दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates )असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात कमी झाल्याचे दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या.

सोन्याच्या भावाने घेतली उसळी

22 कॅरेट सोन्याची किंमत : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹4,985, 8 ग्रॅम ₹39,880, 10 ग्रॅम ₹49,850, 100 ग्रॅम ₹4,98,500 आहेत. (22 Carat Gold Price Per Gram in India ) प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊया. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹51,050, मुंबईत ₹50,150, दिल्लीत ₹50,300, कोलकाता ₹50,150, हैदराबाद ₹50,150 आहेत. ( Indian Major Cities Gold Rates Today )

चांदीचे आजचे दर : चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹72.30, 8 ग्रॅम ₹578.40, 10 ग्रॅम ₹723, 100 ग्रॅम ₹7,230, 1 किलो ₹72,300 तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊयात चेन्नई मध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹746, मुंबईत ₹723, दिल्लीत ₹723, कोलकाता ₹723, बंगळुरू ₹746, हैद्राबाद ₹746 (Gold Silver Rates in India) आहेत. ( Silver Rate in Major Cities) लग्नसराईच्या तोंडावरच सोन्याच्या भावात प्रचंड वाढ झाल्याने सोने खरेदी करणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात जवळपास तीन हजारांची वाढ झाल्याने लग्नसरायीची खरेदी कशी करावी हा मोठा प्रश्न पडला आहे.

ग्राहकांना पर्याय नाही लग्नसराईला घ्यावेच लागते सोने :गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे संपूर्ण जगातील उद्योगधंद्यांवर प्रचंड परिणाम झाला होता. त्यानंतर आता कुठे सर्व पूर्वपदावर येत असताना सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने ग्राहक आणि दुकानदार त्रस्त झाले आहेत. गेल्या महिन्याभरामध्ये सोन्याचे भाव तब्बल तीन हजारांनी वाढले आहे. टाईम लग्नसराईसाठी सोने खरेदी कशी करावी हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. त्यातच दिवाळीनंतर सोने दरात मोठी वाढ झाली असली तरीही लग्नकार्यासाठी थोडेफार सोने खरेदी करावेच लागेल त्यामुळे त्यामुळे वाढीव दरात का होईना पण थोडीफार सोने करावीच लागेल असे ग्राहकांनी सांगितले. या संदर्भात सरकारने मध्यस्थी करून काहीतरी तोडगा काढावा असे मनोगत देखील त्यांनी व्यक्त केले. सोन्याच्या विक्रीमध्ये मंदी आली होती. परंतु आता लग्नसराई सुरू झाल्याने ग्राहक पुन्हा एकदा सोने खरेदीकडे वळतील अशा आशेवर असणाऱ्या दुकानदारांना देखील मोठा फटका बसला आहे. सोन्याच्या दराने एवढी मोठी उसळी घेतल्याने ग्राहक कमी प्रमाणात सोने घेतील त्यामुळे आपले उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम होईल अशी भीती दुकानदारांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details