मुंबई : कर बचत गुंतवणूक करण्याची हीच वेळ आहे. २०२२-२३ आर्थिक वर्षातील जानेवारी महिना सुरू आहे. तुमचे कर ओझे कमी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ELSS) स्टॉक मार्केटमध्ये फायदेशीर गुंतवणूक ठरत आहे. आर्थिक उद्दिष्टे साध्य करताना दीर्घकालीन गुंतवणुकीचे एकत्रित फायदे त्यामुळे मिळतात. चला तर मग काही कर बचत योजना पाहूयात ज्या तुमचे आर्थिक नियोजन पूर्ण करतील.
कर बचत :आर्थिक नियोजनातील एक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे कर बचत. हे आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून सुरू व्हायला हवे. मात्र, बहुतेक लोक चौथ्या आणि शेवटच्या तिमाहीत याबद्दल विचार करतात. अशा वेळी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये. जरी वेळ खूप कमी असला तरीही तुम्ही योग्य योजना निवडली, तर तुम्हाला लक्षणीय कर लाभ मिळू शकतो. विशिष्ट योजना ऑफर करत असलेल्या दीर्घकालीन फायद्यांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
इक्विटी लिंक्ड बचत योजना :इतर योजनांच्या तुलनेत, इक्विटी लिंक्ड बचत योजना विविध प्रकारचे फायदे देतात. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतात. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, इक्विटी लिंक्ड बचत योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीला करातून सूट मिळते. त्याची मर्यादा प्रति वर्ष 1,50,000 रुपये आहे. याशिवाय, इक्विटी लिंक्ड बचत योजना नियमित म्युच्यूअल फंड योजनांप्रमाणे काम करतात. यात काही पैलू आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे. इक्विटी लिंक्ड बचत योजनेला किमान तीन वर्षे गुंतवणूक चालू ठेवणे आवश्यक आहे . त्यात कर सूट मर्यादित रकमेपर्यंत उपलब्ध आहे. त्यात वाढ, लाभांश आणि पुनर्गुंतवणूक पर्याय देखील आहेत. 3-वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर, इक्विटी लिंक्ड बचत योजना सुलभ तरलता पर्यायासह चालतात.