महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Elon Musk Tesla : एलन मस्क टेस्लात चार वर्षांपासून बिनपगारी, तरीही अशा पद्धतीने करतो अब्जावधींची कमाई - Elon Musk paid salary four years ago

जगातील दुसरा सर्वात मोठा अब्जाधीश एलन मस्क सध्या टेस्लामध्ये मोफत काम करत आहे. टेस्ला ही इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी आहे. गेल्या चार वर्षांपासून एलन मस्कने पगार घेतलेला नाही. मात्र त्या बदल्यात त्याने शेअर्स घेतले आहेत.

Elon Musk Tesla
इलॉन मस्क टेस्लात बिनपगारी काम

By

Published : Feb 23, 2023, 7:39 AM IST

नवी दिल्ली :एलन मस्क याला 2019 पासून रोख स्वरूपात कोणतेही वेतन मिळालेले नाही. चार वर्षांपूर्वी त्यांना 23,760 डॉलर पगार मिळाला होता. कॅलिफोर्नियाच्या किमान वेतनाच्या नियमानुसार त्याला हे पेमेंट करण्यात आले होते. मस्क यांना इतर कर्मचार्‍यांप्रमाणे नियमित पगार मिळाला नसला तरी त्याला पॅकेज म्हणून कंपनीतले स्टॉक मिळातात. यामुळे गेल्या वर्षी तो जगातील सर्वात मोठा श्रीमंत बनला होता. या अंतर्गत एलन मस्कला कंपनीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करण्याचा पर्याय आहे. तो यात लाखो शेअर्स खरेदी करू शकतो.

मस्ककडे सध्या ४१२ लाखांचे शेअर्स :एलन मस्ककडे सध्या 412 लाखांचे शेअर्स आहेत. तसेच, त्याच्याकडे आणखी 30.4 कोटी शेअर्स खरेदी करण्याचा पर्याय आहे. विशेष म्हणजे, तो हे शेअर्स 23.34 प्रति डॉलरने खरेदी करू शकतो. तर टेस्लाच्या शेअरची किंमत सध्या 208.31 डॉलर आहे. गेल्या वर्षी टेस्लाच्या समभागांची किंमत 65 टक्क्यांनी घसरली होती. तर यावर्षी ती 69 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे मस्कची एकूण संपत्ती 50 बिलियन पेक्षा जास्त वाढली आहे. तो या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा अब्जाधीश आहे.

56 अब्ज डॉलर किमतीचे टेस्ला स्टॉक : टेस्लाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर लवकरच मस्कसाठी नवीन पॅकेज जाहीर करू शकतात. त्याला मोठे पॅकेज दिले जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 2018 ची योजना मस्कला लक्षात घेऊन तयार करण्यात आली होती. असा काही भागीदारांनाचा आरोप आहे. त्यासंदर्भातील प्रकरण न्यायालयात आहे. 2018 च्या पॅकेजनुसार त्याला सुमारे 56 अब्ज डॉलर किमतीचे टेस्ला स्टॉक दिले गेले. जे भागधारक रिचर्ड टोर्नेटा यांनी दाखल केलेल्या खटल्याचा भाग आहे. मस्कच्या वकिलांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले की टेस्लाने त्याला अब्जावधी डॉलर्सचे टेस्ला शेअर्स दिले. 198 अब्ज संपत्तीत बहुतेक पैसे हे त्याला टेस्लाकडूनच येतात. मस्क जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 187 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

एलन मस्कचा आदेश, ट्विटरची कार्यलये बंद :जगभरात मंदीचे सावट घोंगावत आहे. त्यावर ट्विटरनेही भारतातील त्याची दोन कार्यलये बंद केली आहेत. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचा आदेश ट्विटरकडून देण्यात आला आहे. 2023 च्या शेवटच्या महिन्यापर्यंत एलन मस्क यांनी ट्विटरला वित्तिय स्थिरता देण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. त्यामुळे ट्विटरच्या कार्यालयाचे भाडे देण्यास एलन मस्क असमर्थ ठरत असल्याचे मिम्स सध्या सर्व ठकाणी व्हायरल होत आहेत.

हेही वाचा :Ola Uber Rapido Bikes banned: परिवहन विभागाचा मोठा निर्णय.. ओला, उबेर, रॅपीडोच्या बाईक सेवेवर बंदी..

ABOUT THE AUTHOR

...view details