महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Job in India : तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदी दरम्यान, 'या' नोकरीला भारतात सर्वाधिक मागणी आहे

वर्षाच्या सुरुवातीला तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये (आयटी) टाळेबंदीच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या. या वर्षी, बहुतेक लोकांना तंत्रज्ञान कंपन्यांमधून काढून टाकण्यात आले. पण या सर्व गोष्टी असूनही भारतात नोकरीची मागणी सर्वाधिक आहे. चला जाणून घेऊया त्या कामाबद्दल.

Job in India
तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदी

By

Published : Mar 15, 2023, 4:21 PM IST

नवी दिल्ली:मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये (आयटी) सुरू असलेल्या टाळेबंदी दरम्यान, डेव्हलपरला भारतात सर्वात जास्त मागणी असल्याचे दिसुन येत आहे. विशेषत: जे वेब ऍप्लिकेशन्सचे फ्रंट-एंड आणि बॅक-एंड डिझाइन, विकसित आणि देखरेख करू शकतात, अश्या डेव्हलपरला अधिक मागणी आहे, एका अहवालात ही बाब समोर आली आहे. टाळेबंदी असूनही भारतातील नावाजलेल्या 20 नामांकित कंपण्यापैकी 15 कंपण्यांमध्ये अद्याप तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, असे अहवाल सांगतो.



कोणत्या नोकऱ्यांना मागणी आहे : कोवीडच्या आजारानंतर ज्या नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे, ती म्हणजे डेटा इंजिनिअर (353 टक्के), साइट रिलायबिलिटी इंजिनिअर (260 टक्के), सहाय्यक अभियंता (254 टक्के), ॲप्लिकेशन डेव्हलपर (235 टक्के) आणि क्लाउड इंजिनिअर्स ( 220 टक्के).




टेक कंपन्यांना जास्तीत जास्त भरतीची अपेक्षा आहे : Indeed India चे भारताचे विक्री प्रमुख शशी कुमार म्हणाले की, 'एकंदरीत, या वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रा मध्ये सर्वाधिक भरती होणार आहे. भारत स्थिर वाढ पाहत आहे आणि मंदी आणि टाळेबंदीचे अल्पकालीन परिणामांची, देशातील तांत्रिक भूमिकांच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता नाही. IT मधील वाढती गुंतवणूक आणि नव्या युगातील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे या क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्येही यावर्षी वाढ दिसून येईल, असेही ते म्हणाले.




तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या संख्येने नोकऱ्या : मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या सुधारणांच्या टप्प्यातून जात असताना, इतर कंपन्या प्रमुख तंत्रज्ञानातील प्रतिभा शोधण्यासाठी तयार दिसतात. हे मुख्यत्वे या वस्तुस्थितीमुळे आहे की, तंत्रज्ञान क्षेत्रात इतर कोणत्याहीपेक्षा क्षेत्रापेक्षा मोठ्या संख्येने नोकऱ्या आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि बाहेरील तांत्रिक कौशल्यांची उच्च मागणी ही टेक कामगारांसाठी चांगली बातमी आहे आणि करिअर सुरू करू किंवा बदलू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी संधी कोठे आहेत? याचे स्पष्ट संकेत आहेत. तेव्हा काही महिन्यानंतरच तंत्रज्ञान क्षेत्रातील परिस्थिती सुधारेल.

ABOUT THE AUTHOR

...view details