महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Credit Card : परदेशी प्रवास करताना वापरा क्रेडिट कार्ड

परदेशी सहलींसाठी रोख रक्कम , फॉरेक्स कार्ड आणि ट्रॅव्हलर चेक ( traveler cheques ) असले तरी क्रेडिट कार्ड ( credit cards ) काही फायदे देखील देतात. या लेखात क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे आणि घ्यायची काळजी याविषयी जाणून घेऊया...

Credit Card
Credit Card

By

Published : Mar 29, 2022, 3:53 PM IST

Updated : Mar 29, 2022, 7:04 PM IST

हैदराबाद :परदेशी सहलींसाठी रोख रक्कम , फॉरेक्स कार्ड आणि ट्रॅव्हलर चेक ( traveler cheques ) असले तरी क्रेडिट कार्ड ( credit cards ) काही फायदे देखील देतात. बँक बझारचे सीईओ ( Bank Bazaar CEO ) अधील शेट्टींनी परदेशी प्रवासावर क्रेडिट कार्डचे फायदे सांगितले. आणि याचा वपर करणे महत्वाचे असल्याचे सांगतात.रोख रक्कम काढण्याच्या सोयीव्यतिरिक्त, यात तुम्हाला रिवॉर्ड्स, कॅशबॅक आणि खरेदीसाठी सूट मिळेल. म्हणून क्रेडिट कार्ड बाळगणे ही मुख्य गोष्ट आहे.

योग्य क्रेडिट कार्ड वापरा :अनेक प्रकारची क्रेडिट कार्ड बाजारात उपलब्ध आहेत. कार्डच्या आधारे फायदे जाणून घेता येतात. क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी खालील गोष्टी तपासा. ट्रान्झॅक्शन फी, लेट पेमेंट फी, रिवॉर्ड्स, डिस्काउंट आणि सर्व तपशील आणि तुम्ही भेट देत असलेल्या देशात कार्ड स्वीकारल्याबद्दल दोनदा तपासा.

माहिती शेयर करा :प्रवासासाठी निघण्यापूर्वी, क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपनीसोबत तुमच्या गंतव्यस्थानाचा तपशील शेअर करा. इंटरनेट बँकिंग किंवा अॅपद्वारे व्यवहार केले जातील का याची खात्री करा आणि स्वतः कार्ड ब्लॉक करण्याचा पर्याय देखील निवडा, अन्यथा कार्ड अवैध होईल. कारण बँकांना तुमचे व्यवहार फसवे असल्याचा संशय येण्याची शक्यता असते. आणि ते कार्ड तात्पुरते ब्लॉक करू शकतात. अशावेळी, कार्ड अनब्लॉक करण्यासाठी तुम्हाला ताबडतोब ग्राहक सेवा केंद्रावर कॉल करावा लागेल.

आरोग्य विमा :तुम्ही वापरत असलेल्या क्रेडिट कार्डच्या प्रकारानुसार, त्याच्याशी संबंधित अनेक फायदे आहेत. प्रवास विमा हा त्यापैकीच एक. यामुळे मालाचे नुकसान, पासपोर्ट, प्रवास विलंब, अपघात आणि उड्डाणे रद्द झाल्यास नुकसान भरपाई मिळेल. तथापि, विविध प्रकारच्या कार्डांसाठी विमा ऑफर भिन्न असतात. त्यामुळे, प्रवास करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या पसंतीच्या कार्डद्वारे दिले जाणारे विमा फायदे जाणून घेणे आवश्यक आहे. काही कार्ड कंपन्या देशांतर्गत प्रवासासाठी विमा देत नाहीत. तसेच, एटीएममधून पैसे काढताना आकारले जाणारे शुल्क आणि तसेच परदेशी व्यवहार शुल्क तपासा.

एकापेक्षा अनेक कार्ड वापरा :परदेशात प्रवास करताना अधिक क्रेडिट कार्ड बाळगणे चांगले. जर एक कार्ड नाकारले तर दुसरे कार्ड कामी येते. कार्ड व्हिसा, मास्टरकार्ड आणि अमेरिकन एक्सप्रेस सारख्या वेगवेगळ्या नेटवर्कशी संबंधित असल्याची खात्री करा. तसेच सर्व कार्ड एकाच टोपलीत न ठेवता वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये ठेवा. एक गहाळ झाल्यास, तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहू शकता. त्याआधी, प्रत्येक कार्डचे तपशील तुमच्याकडे ठेवा. आणि कार्ड हरवल्यास ब्लॉक करण्यासाठी संबंधित बँकेला कळवा

हेही वाचा -Drinking coffee : कॉफी पिणे शरीरासाठी फायदेशीर

Last Updated : Mar 29, 2022, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details