महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Credit cards impact : आत्ताच लक्ष द्या नाहीतर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होईल 'असा' परिणाम - क्रेडिट मर्यादा

आपल्याला जास्तीत जास्त लाभ मिळायला हवा म्हणून आपण क्रेडिट कार्डकडे सतत लक्ष दिले पाहिजे. जास्तीत जास्त क्रेडिट लिमिट घ्या पण क्रेडिट कार्डचा कमीत कमी वापरा. जर कर्जा घेण्याचे प्रमाण कमी असेल तर तुमच्या क्रेडिट अहवालावर सकारात्मक (Credit cards impact) परिणाम होईल. तुम्हाला कमी क्रेडिट मर्यादा देणारी कार्डे रद्द (your credit score will be affected) करा.

Credit cards impact
क्रेडिट स्कोअर

By

Published : Jan 5, 2023, 10:00 AM IST

हैदराबाद : सध्याच्या डिजिटल जगात क्रेडिट कार्ड ही सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे. आपण आपल्या क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व पैलूंवर सतत लक्ष दिले पाहिजे. क्रेडिट कार्ड ब्लॉक किंवा रद्द करतानाही काळजी (Credit cards impact) घ्या. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास बँकाही कार्ड्स देतात. जेव्हा गरजेपेक्षा जास्त कार्ड्स असतील, तेव्हा शक्य तितके कमी क्रेडिट मर्यादा असलेले कार्ड बंद करा.

कर्ज घेण्याचे प्रमाण कमी ठेवावे : बँका वेळोवेळी तुम्हाला क्रेडिट मर्यादा वाढवण्याची ऑफर (Maximum credit limit) देतात. या संधीचा जास्तीत जास्त वापर करा. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही जास्त खर्च करू शकता. तुमचे कर्ज घेण्याचे प्रमाण कमी ठेवावे. समजा तुमच्याकडे 70,000 रुपयांची मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड आहे. तुम्ही 7,000 रुपये खर्च केल्यास, क्रेडिटचा वापर 10 टक्क्यांवर येतो. 20,000 रुपयांच्या मर्यादेच्या कार्डमध्ये, तुम्ही जर 2,000 रुपये वापरत असाल तर ते 10 टक्के इतकाच वापर होईल.

क्रेडिट स्कोअरवर परिणाम :कमी मर्यादा असलेले कार्ड्स तुमच्या कर्जाचे प्रमाण वाढवू शकतात. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम (check your credit score and history) होतो. म्हणून, जेव्हा तुमच्याकडे दोन किंवा तीन क्रेडिट कार्ड असतील, तेव्हा कमी मर्यादेचे कार्ड रद्द करा. तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक कार्डावरील क्रेडिट लिमिटच्या वापरावर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जास्तीत जास्त संभाव्य क्रेडिट मर्यादा आणि सर्वात कमी कर्जाचे प्रमाण असलेले एक कार्ड असणे चांगले.

नवीन घेतलेले कार्ड रद्द करू शकता :तुम्ही घेतलेले पहिले क्रेडिट कार्ड हा चांगला क्रेडिट स्कोअर ठेवण्याचा तुमचा सर्वोत्तम मार्ग आहे. शक्य तितक्या लांब ते सुरू ठेवा. तुम्ही बराच काळ वापरत असल्याने, तुमचा क्रेडिट इतिहास आणि स्कोअर त्यावर (your credit score will be affected) अवलंबून असेल. ते रद्द केल्याने नकारात्मक परिणाम (Cancel credit cards ) होईल. नवीन घेतलेले कार्ड रद्द करण्यात कोणतीही मोठी अडचण नाही. सर्वात जुन्या कार्डसाठी बँकेला शक्य तितकी मर्यादा वाढवण्यास सांगा. वार्षिक शुल्क जास्त असल्यास कमी करण्यास सांगा.

रिवॉर्ड पॉइंट्स वापरा: कार्ड रद्द करण्यापूर्वी सर्व रिवॉर्ड पॉइंट्स वापरा. बहुतेक लोक या रिवॉर्ड पॉइंट्सकडे लक्ष देत नाहीत. यात हजारो रिवॉर्ड पॉइंट्स असू शकतात. कोणत्याही खरेदीसाठी हे सर्व वापरा. त्यानंतरच कार्ड ब्लॉक करा. एक रुपयाची थकबाकी असली तरी कार्ड रद्द करता येत नाही. बिल अजिबात थकीत नाही याची खात्री करा. आवश्यक असल्यास, थोडे अधिक पैसे द्या.

बँकेशी संपर्क साधू शकता : कार्डवर कोणत्याही स्थायी सूचना नाहीत याची खात्री करा. प्रथम, त्या कार्डद्वारे होणारी कोणतीही देयके दुसर्‍या कार्डवर वळवली जावीत. हे सर्व पूर्ण केल्यानंतर, बिलिंग कालावधी संपल्यानंतरच कार्ड रद्द करा. जुने कर्ज भरल्यानंतर आणि रिवॉर्ड पॉइंट्स वापरल्यानंतर तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकता. कार्ड यापुढे चालू नाही याची खात्री करा.

अहवालावर कार्ड रद्द झालेले दिसले पाहिजे :कार्ड रद्द करण्याची विनंती ऑनलाइन आणि मोबाइल अ‍ॅपवर करता येते. बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही ई-मेल, फोनद्वारे कार्ड रद्द करत असल्याचे सांगा. रद्द करण्याची विनंती केल्यावर बँक लगेच क्रेडिट कार्ड बंद करतात. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास थोडा वेळ लागतो. बँकेकडून नो-ड्यूज प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. कोणताही वाद टाळण्यासाठी तुमच्या क्रेडिट अहवालावर कार्ड रद्द झालेले दिसले पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details